जत,प्रतिनिधी : तिप्पेहळ्ळी ता.जत येथे एकास जंयतीची वर्गणी दिली नाही म्हणून गंभीर मारहाण करण्यात आली.भानुदास सिध्दा सुर्वे (वय-65) व त्यांची पत्नी शालिनी सुर्वे हे मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत.
याप्रकरणी जत पोलिसात तिघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.घटना ता.29 एप्रिलला संध्याकाळी 10 वाजता घडली.
अधिक माहिती अशी, सुर्वे यांना एका महापुरूषाची जंयती साजरी करायची आहे. म्हणून संतोष दगडू शिवशरण, संभाजी ज्ञानोबा शिवशरण, दयानंद शंकर मोरे रा.तिप्पेहळ्ळी यांनी 10 हजार रूपयाची वर्गणी मागितली. सुर्वे यांनी वर्गणीस नकार दिल्याने त्यांना व पत्नीस बेदम मारहाण करण्यात आली.असे सुर्वे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.अधिक तपास पोलिस निरिक्षक गजानन कांबळे करत आहेत.