कायम कुलूप बंदने उद्भवलेली स्थिती : नव्याने पोलिस स्टेशन निर्मितीची मागणी
संख, वार्ताहर : जत तालुक्यातील व नियोजित तालुका होणारे ठिकाण असलेल़्या उमदी पोलिस स्टेशन अतर्गंत असणारी संख ओटपोस्ट असून अडचण नसून खोंळबा अशा स्थितीत आहे. गेले अनेक दिवसापासून चौकी न उघडल्याने तेथे अघोषित दुचाकीचे वाहनतळ बनले आहे.
नेमून दिलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे कधीतर दर्शन होत असल्याचा ग्रामस्थाचा आरोप आहे. मात्र सर्वच अवैद्य धंदे उघडपणे सुरू आहेत.
जत पुर्व भागातील संख परिसरातील अनेक गावासाठी तत्कालीन क्राईम रेट गृहीत धरून तो रोकावा यासाठी पोलिस ओटपोस्टची निर्मिती करण्यात आली. पंरतू पोलिस चौकी व पोलिस कर्मचारी नेमणूक करण्यात आली आहे. ज़्या उद्देशाने चौकी झाली तो उद्देश असफल झाला आहे. येथे कोणता अवैद्य धंदा सुरू नाही असा नाही. मटका,अवैद्य दारू,चंदनतस्करी गांजा,अवैद्य प्रवाशी वाहतूक,आतरराष्ट्रीय पत्याचे अड्डे उघडपणे सुरू आहेत. याशिवाय पोलिसाच्या सहकार्यकाने अनेक दादागिरी करणारे गट तयार झाले असून यांना पोलिसाचा पांठिबा असल्याने नागरिक दहशती खाली आहेत.
सध्या जिल्ह्यातील नव्याने सांगली व जत तालुक्यातील संख,माडग्याळ,उमदी यापैंकी एका ठिकाणी तालुका होण्याचे संकेत आहेत. मध्यवर्ती असणाऱ्या संखचा विचार होण्याची जादा शक्यता आहे. अशा वेळी पोलिसावर मोठी जबाबदारी पडू शकते त्यामुळे चौकीत कायमस्वरूपी पोलिस नेमावेत अशी मागणी आहे.
दरम्यान अवैद्य धंदा रोकण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुखांनी स्वंतत्र पथक नेमून सर्वच अवैद्य धंदे मुळासह संपवावेत अशी मागणी होत आहे.
कर्नाटकला लागून असल्याने या चौकीत कायमस्वरूपी पोलिस असणे गरजेचे आहे मात्र नेमून दिलेले पोलिस वेगळ्याच पध्दतीने कामकाज करत असल़्याची चर्चा आहे. त्यांना अवैद्य धंदे बंद करण्याऐवजी त़्यांना बंळ देण़्यात रस असल्याने अवैद्य धंदे दिवसेनदिवस बंळावत असल्याचे चित्र आहे.
भविष्यातील तालुक्याचे ठिकाण गृहीत धरून नव्याने चौकीच्या ठिकाणी पोलिस स्टेशनची निमिर्ती करून सा. पोलिस निरिक्षक दर्जांचा अधिकारी नेमावा अशी मागणी होत आहे.
संख : संख येथे मुख्य चौकात असलेली पोलिस ओटपोस्ट कायम बंद असल्याने दुचाकीचे वाहनतळ बनले आहे.





