पुणे : माजी माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी (रविवारी) निवड जाहीर करण्यात आली. पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक गुलटेकडी (पुणे) येथील निसर्ग कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकारी ,माजी सभापती दिलीपराव वळसे पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी आ.पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने आ.पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर केली. तत्पूर्वी मावळते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आ.पाटील यांचे नाव सुचविले. त्यास साताऱ्याचे आ.शशिकांत शिंदे,विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी त्यांच्या नावास अनुमोदन दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, देशाचे माजी कृषी मंत्री खा.शरदचंद्र पवार (साहेब) यांच्या हस्ते आ.जयंतराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,राष्ट्रीय नेते डी.पी. त्रिपाठी,माजी खा.प्रफुल्ल पटेल,खा.सुप्रिया सुळे, खा.विजय दादा मोहिते-पाटील,पदमसिह पाटील,हसन मुश्रीफ, आण्णासो डांगे,गणेश नाईक,राजेश टोपे, फौजिया खान, खा.धनंजय महाडिक यांच्या सह पक्षाचे राज्य व राष्ट्रीय पातळीवरचे नेते,पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.