नवी दिल्ली: युपीएससी परिक्षेतील यशस्वी गणेश टेंगले यांचा विक्रम ढोणे यांच्याकडून सत्कार | www.sankettimes.com

0
11

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील दुसरे आयपीएस ऑफीसर बनलेले गणेश टेंगले यांचा दिल्ली येथे सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी पेढा भरवून अभिंनदन केले.तसेत सत्कार केला.

जत तालुक्यातील कुलाळवाडी येथील गणेश टेंगले यांचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत बाजी मारली आहे.ऑल इंडिया रँन्क 614 क्रंमाक पटकाविला.जत सारख्या दुष्काळी तालुक्यातील

 

दुसरा आयपीएस ऑफीसर म्हणून निवड झाली आहे.कोणतीही अनुकूल परिस्थिती नसताना गणेश टेंगले याचे हे यश कौतुकास्पद आहे. त्याचे तालुक्यात अभिंनदन होत आहे.खडतर परिश्रम व सातत्य यामुळे हे यश मिळविणे शक्य झाल्याचे व  यापुढे शक्य तेवढ्यावेळी तालुक्यातील स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करणार असल्याचे टेंगले यांनी सांगितले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here