जत | को.बोबलाद घटनेच्या निषेधार्थ जतमध्ये कडकडीत बंद | www.sankettimes.com

0
14

जत, प्रतिनिधी

कोंतेबोबलाद (ता.जत) येथील ग्रामपंचायत निवडणुक वादातून दलित कार्यकर्त्यांना मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ जत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बसपा, काँग्रेसने बंदे अवाहन केले होते.

को. बोबलाद येथील

श्रीशैल कांबळे, माणिक पुंडलिक कांबळे, भिमाण्णा सेदाप्पा कांबळे, सेदाप्पा कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ करून, बेल्ट,काठी,लाथाबुक्यांनी घरात घुसून मारहाण केली होती.  याप्रकरणी आमदार विलासराव जगताप यांचे पुत्र मनोज यांच्यासह नऊजणांविरूध्द गुन्हा दाखल आहे.

या घटनेच्या निषेधार्थ जत बंदचे अवाहन करण्यात आले होते. बुधवारी सकाळपासून शहरात सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. तणावाचे वातावरण असल्याने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जलद कृती दलास पाचारण करण्यात आले होते. मात्र कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. दुपारी बसपचे नगरसेवक भूपेंद्र कांबळे, काँग्रेस सरचिटणीस नाना शिंदे, बाळ निकम यांनी पोलीस उपअधिक्षक नागनाथ वाकुडे यांना मागण्यांचे निवेदन दिले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here