जत | जालिंदर कांबळे विरोधात गुन्हा दाखल | www.sankettimes.com

0
2

जत,प्रतिनिधी : जत शहरातील विशाल तुकाराम कांबळे यांना पैशाच्या वादातून तलवार दाखवत दमदाडी केल्याप्रकरणी जालिंदर नामदेव कांबळे याच्या विरोधात गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी, विशाल व जालिंदर यांच्यावर मटक्याची केस झाली होती. त्यांची केस जत न्यायालयात सुरू आहे. आता केस बोर्डावर आली आहे. आतापर्यत केसचा सर्व खर्च विशाल कांबळे यांने घातला आहे. यापुढचा खर्च तु बघ म्हणून विशाल यांने जालिंदरला सांगितले होते.त्याचा राग मनात धरून जालिंदरने शेगाव चौकात विशालला गाठत तलवारीचा धाक दाखवत दमदाडी करत असताना बाजूच्या नागरिकांनी हस्तक्षेप करत तलवार काढून घेत जालिंदरला जत पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी विशाल यांने दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल झाला आहे. तलवारही जप्त करण्यात आली आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here