जत | गुड्डापूर येथील मोफत सर्व धर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्याचा लाभ घ्यावा : महावीर जोगी | www.sankettimes.com

0
15

जत,प्रतिनिधी : आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबे, गोरगरीब, अनाथ, निराधार कुटुंबातील मुला-मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा राज्याचे धर्मादाय आयुक्त यांच्या पुढाकाराने राज्यभर आयोजित करण्यात आला आहे.जत तालुक्यातील गुड्डापूरमध्ये जिल्हास्तरीय विवाह सोहळा 6 मे रोजी पार पडणार असल्याची माहिती धर्मादाय उपआयुक्त महावीर जोगी सांगली यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी 6 मार्च रोजी काढलेल्या परिपत्रक क्रमांक 533 नुसार सामुदायिक विवाह सोहळा समिती सांगली जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये शहर व जिल्ह्यामधील नोंदणीकृत धार्मिक, सामाजिक सेवा संस्थांच्या 21 पंचांचा समितीत समावेश करण्यात आला आहे. राज्यात आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची संख्या अधिक असून, त्यांच्या वयात आलेल्या मुला-मुलींच्या विवाहाचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांच्या पुढाकाराने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सामुदायिक विवाह सोहळा समिती स्थापन करण्यात येऊन या समितीद्वारे विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 6 मे रोजी होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी 101 तरुण-तरुणींचे प्रस्ताव अपेक्षित असल्याचे यावेळी सांगण्यात आले. एका जोडप्याच्या विवाहाला सुमारे 40 ते 50 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असून,  निधी संकलित करण्यात येतआहे. या विवाह सोहळ्यासाठी गरजू, गोरगरीब सर्वधर्मीय कुटुंबातील व्यक्ती कायद्यानुसार मुला-मुलींचे वय पूर्ण असल्यास नोंदणी करू शकतात, असे पंडित यांनी स्पष्ट केले. हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, मुस्लीम अशा सर्वच धर्मांच्या परंपरेनुसार विवाह लावला जाणार अाहे.
प्रत्येक जोडप्याला अर्धा तोळे सोन्याचे मणी-मंगळसूत्र व संसारोपयोगी वस्तू व किमान 100 वऱ्हाडींची भोजनव्यवस्था करून दिली जाणार आहे.श्री. धानम्मादेवी देवस्थान ट्रस्ट तिर्थक्षेत्र गुड्डापूर ता.जत येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. एका जोडप्याच्या विवाहाला सुमारे 40 ते 50 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले. 

धर्मादाय कार्यालय सांगली,सामुदायिक विवाह सोहळा समिती मिरज,उमा हॉस्पिटल जत,मोहन सारडा आडत दुकान मार्केट यार्ड सांगली, धानम्मादेवीची देवस्थान ट्रस्ट गुड्डापूर, बिरोबा देवस्थान ट्रस्ट आरेवाडी,श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट खरसुंडी,रेवणसिध्द देव ट्रस्ट रेणावी,वॉन्लेस( मिशन)हॉस्पिटल मिरज,अबिंका देवालय जिर्णोद्वार ट्रस्ट ऊरण-इस्लामपुर येथे विवाह इंच्छुकांनी नोंदणी करायची आहे.या सामुदायिक विवाह सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन धर्मादाय उपआयुक्त महावीर जोगी यांनी करण्यात आले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here