माडग्याळ | व्हसपेठ-चडचण रस्ता मजबूतीकरण कामाचे उद्घाटन | www.sankettimes.com

0
6

माडग्याळ, वार्ताहर: 

माडग्याळ येथे हसपेठ ते चडचण रस्ता मजबूतीकरण कामाचे उद्घाटन व ग्रामीण रुग्णालय माडग्याळचे लोकार्पण महसूल तथा बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.यावेळी सहकार तथा पालकमंत्री सुभाष देशमुख,खा.संजय पाटील, आमदार विलासराव जगताप भाजप नेते डॉ.रविंद्र आरळी उपस्थित होते. हसपेठ ते चडचण या मार्गाची दुवस्था झाली आहे.खड्डे व दबलेल्या साईट पट्ट्यामुळे अपघात प्रणव रस्ता बनला होता. हा मार्ग माडग्याळ, सोन्याळ,उटगी, उमदी असा जत तालुक्यातील पुर्व भागांना जोडणारा आहे.यांच्या कामासाठी बांधकाम विभागाकडून निधी उपलब्धं झाला आहे. त्या कामाचे शनिवारी औपचारिक पुजन करण्यात आले आहे. खऱ्या अर्थाने दर्जेदार रस्ता करणे आता बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हातात आहे.अनेकवेळा कामे होऊनही हा मार्ग कायम खड्डेमय राहिला आहे.त्याचे मजबूतीकरण काम पुन्हा होणार अाहे.तसेच नव्याने लोकार्पण झालेले ग्रामीण रुग्णालयांचा कारभार रुग्ण सेवेचा होणे आता गरज आहे. मंत्री महोदय व खासदार,आमदारांनी रुग्णालयाची पाहणी केली.

 यावेळी बांधकाम मंडळ कोल्हापूरचे अधिक्षक एस.एस साळुखे,आरोग्य व शिक्षण सभापती तम्मानगौंडा रवीपाटील,संरपच इराण्णा जत्ती, माजी संचालक साखर कारखाना विठ्ठल निकम, पंचायत समिती सदस्य विष्णू चव्हाण सर, लक्ष्मण कोरे,व गावातील नागरिक उपस्थित होते.दरम्यान मंत्री पाटील व त्यांच्या बरोबरचे सर्व मान्यवरांनी बालगाव येथील आश्रमास भेट दिली.

माडग्याळ : व्हसपेठ – चडचडण रस्ता मजबूतीकरण कामाचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख, खा.संजय पाटील, आ.विलासराव जगताप उपस्थित होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here