जत,प्रतिनिधी:
जम्मू काश्मीर मधील कठुआ जिल्हा हीरानगर तालुक्यातील रसाना गावात 8 वर्षीय आसेफ़ा हिच्यांवर सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली होती.या निंदनीय घटनेच्या निर्षेधार्थ जत शहरात सर्व धर्मीय व सर्व पक्षीय मूक मोर्चाचे काढण्यात आहे.आरोपीवर फाशी शिक्षा देऊन पिडिताला न्याय द्यावा या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी, तहसिलदारांना देण्यात आले.मोर्चाचे नियोजन तालुका मुस्लिम समाजा तर्फे करण्यात आले होते.या मूक मोर्चाची सुरूवात थोरल्या वेशितील मारुती मंदिरा पासून झाली व त्यानंतर जत शहरातील विविध भागातून अत्यंत शांत पणे मोर्चा पुढे सरकला.शेवटी जत तहसिल कार्यालय येथेे तहसीलदार अभिजीत पाटील व प्रांताधिकारी यांना मोर्चाचे निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली. सदर मोर्चास अखिल भारतीय मराठा सेवा संख,बहुजन समाज पार्टी,जत तालुका राष्ट्रीय कांग्रेस पार्टी,जत तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, दलित महासंख, शिवसेना महाराष्ट्र कामगार सेना सह विविध संघटनानी पाठिंबा दिला.
जत : जम्मू काश्मिर घटनेच्या निर्षेधार्थ जत शहरात निघालेला भव्य मोर्चा






