जत,प्रतिनिधी : जतचे तहसिलदार अभिजित पाटील हे कतृव्यदक्ष अधिकारी म्हणून जत तालुक्यातील परिचित आहेत.जत तालुक्यातील जलयुक्त शिवार, पाणी,नाम फौंडेशनचे प्रभावी कामे करून जतची टँकर मुक्ती करण्यापर्यतचे महत्वपुर्ण काम तहसिलदार पाटील यांच्या थेट सहभागने शक्य होत आहे.सर्व विभागात पाटील यांनी शिस्त लावली आहे.सामान्य जनतेला अभिप्रेत असलेले प्रशासन तहसिलदार पाटील यांच्यामुळे शक्य झाले आहे.
त्यांच्या कार्यालयाचा परिसरतील हिरव्यागार वृक्षांनी त्याचे कार्यतत्परात सिध्द करते.गुरूवारी त्यांची कार्यतत्परात पुन्हा सिध्द झाली.त्याचे झाले असे,मुर्दाड स्टॅप विक्रेत्याकडे वज्रवाड येथील दोन वयोवृध्द शेतकरी स्टॅप घेण्यासाठी आले होते.तब्बल तासभर त्यांनी जवळपास सर्वच स्टॅप विक्रेत्यांना विंनती करत स्टॅपची मागणी केली.मात्र जादा कमाईच्या कामात व्यस्त विक्रेत्यांनी स्टॅड संपलेत म्हणून त्यांना धुडकाऊन लावले. बिचारे शेतकरी हताश होऊन आजचा दिवस गेल्याचे दु:ख उराशी घेऊन घरी निघाले होते.तेवढ्यात बागलवाडीच्या पाणी फौंडेशनच्या कामात श्रमदान करण्यासाठी निघालेले तहसिलदार अभिजित पाटील यांना वज्रवाडच्या एका सामाजिक कार्यकर्त्याने साहेब गेल्या तासभरापासून हे वयोवृध्द शेतकरी स्टँप मागत आहेत.त्यांना स्टँप विक्रेते स्टँप संपल्याचे सांगत आहेत.तुम्ही काही करा अशी विंनती केली.एकंदरीत असे अधिकारी आपल्या कर्मचांऱ्याकडून कारवाईचे आदेश देतात असल्याचे चित्र असते.मात्र तहसिलदार पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता गाडी थांबवत त्या शेतकऱ्यांसह स्टँप विक्रेत्याकडे जात स्टँप संपलेत काय? का दिला नाही.असे सांगत विक्रेत्यांची कानउघडणी करत, अशी तक्रार पुन्हा येऊ देऊ नका असे आदेश दिले.समोर उपस्थित शेतकऱ्यांना विक्रेत्यांनी साहेबाचा आदेश येताच आपल्या बँगेत बंद स्टँप तातडीने दिला.मात्र एका तहसिलदारांच्या कार्यतत्परतेबद्दल संबधित शेतकरी व उपस्थित जनतेनी कृत्यज्ञता व्यक्त केली.चांगले अधिकारीच सामान्य जनतेच्या हितासाठी कठिबंध्द असताता हे पुन्हा एकदा सिध्द झाले.
स्टँप विक्रेत्यांची मुजोरी कायम जत तालुक्यातील मोठ्या प्रमाणात स्टँप विक्रेते आहेत.तहसिल कार्यालयात त्यांची बसण्याची व्यवस्था आहे.सर्वाधिक मोठा तालुका असल्याने खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार दिवसभर सुरू असतात.त्यांत माल मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने जवळपास सर्वच विक्रेते खरेदी दस्त करण्यात गुंतलेले असतात.त्यात एकादा स्टॅप पाहिजे म्हणून आल्यास सरळ स्टँप संपल्याचे सांगतात.अगदी 70 किलोमीटर वरून आलेल्या एकाद्या शेतकऱ्यांनाही सरळ स्टँप दिला जात नाही.दुसरीकडे विक्रेत्यांच्या एंजन्टांना हिरवा गलिच्या अंथरला जातो.सामान्य नागरिकांना एक-दोन विक्रेते वगळता स्टँप दिलाच जात नाही.दररोज स्टँप संपल्याचे उत्तरे सर्रास मिळतात.नेमके स्टँप विक्रेत्यांचे काम काय अाहे हेच संमजत नाही. मात्र त्यांच्या हितासाठी सामान्य लोकांना मोठ्या यातना सोसाव्या लागतात.गुरूवारी तहसिलदारच्या आदेशानंतरही बदल व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




