तीव्र पाणी टंचाईत हाजारो नागरिकाची तहान भागतात हातपंप : दुरूस्थी बाबत उदासीनता
जत,का.प्रतिनिधी : जत शहरासह तालुक्यातील अनेक गावातील लोकांना शुद्ध व नियमितपणे पाणी मिळावे यासाठी जत पंचायत समिती व नगरपालिकेने शहरात सुमारे वीस वषार्पूर्वी शेकडो कुपनलिका बसविल्या. या कुपनलिकांची मात्र आज मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. अनेक गावातील व पालिकेच्यावतीने डागडुजी करण्याअभावी या कुपनलिकांना गंज चढला आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी कपात झाल्यास या कुपनलिकाच नागरिकाची तहान भागवत असतात.जत तालुक्यातील सत्तर टक्के गावासाठी असणाऱ्या नळपाणी योजना बंद पडल्याने
कुपनलिकाच आधार आहे.शहरासह वाढीव त्रिशंकू भागातील लोकांची पाण्याची समस्या दूर व्हावी जत नगरपालिकेने शहरात ठिकठिकाणी कूपनलिका बसविल्या. भूगभार्तून पाईपच्या माध्यमातून हाताच्या दाबाने पाणी वर काढता यावे अशा पद्धतीने कुपनलिकांची रचना करण्यात आली. त्याचा वापर आजही खेडोपाडी नियमित केला जातो. मात्र, शहरासह तालुक्यातील अनेक गावातील अनेक कुपनलिकांना सध्या गंज चढला आहे.संबधित विभागाकडून नियमितपणे देखभाल व दुरूस्ती केली न गेल्याने पाणी असुनही ती पिण्यायोग्य राहिलेले नाही.
शहरातील नागरिकांसाठी एकीकडे पालिकेने बिरनाळ तलावातून सध्या पाणी पुरवठा केला जातो.त्याचबरोबर काही विस्तापित भागातील नागरिकाच्या हातपंप तहान भागवितात.वाढता उन्हाळा पाहता तसेच त्याजोडीला भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची भिती पाहता पाणी बचत करणे व ते जपून वापरणे गरजेचे आहे. शहरातील नागरिकांना दुषित पाण्याच्या समस्येला अनेकदा सामोरे जावे लागत आहे. मात्र, कुपनलीका चोवीस तास शुद्ध पाणी देत असतानाही त्याकडे पालिका डागडुजीसाठी लक्ष देत नाही ही गंभीर बाब आहे.
जत तालूक्यात अस्तित्वात असणाऱ्या शेकडो कुपनलिकांपैकी निम्यावर कुपनलिकांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. अनेक गावातील पाणी योजना पाणी स्ञोत आटल्याने बंद आहेत तर काही गावाना टँकरद्वारे पाणी सोडले जाते तर काही गावात असे हातपंप आधार बनलेत.
काही बंद हातपंपाना पाणी स्ञोत आहेत.त्या कुपनलिकांची दुरूस्ती व देखभाल करणे गरजेचे आहे. कुपनलिकांतून नागरीकांना पाणी मिळत असून त्याची जपणूक करणेही तितकेच गरजेचे आहे.
जत तालुक्यातील काही गावातील हातपंप असणाऱ्या कुपनलिकांची पाणी पातळी खालावली असून तेथील हातपंपाच्या पाईप वाढविल्यास अनेक दिवस पुरेल एवढा पाणी पुरवठा होऊ शकतो.





