डफळापूर | बेंळूखीतील सदानंद पिर ऊरूसाचा उद्या मुख्य दिवस | www.sankettimes.com

0
13

डफळापूर, वार्ताहर : येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक,ग्रामदैवत श्री. संदानंद पिराचा ऊरूस सालाबादप्रमाणे ता.11 मार्च ते 13 मार्च अखेरपर्यत मोठ्या उत्साहत संपन्न होत आहे.

यानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गुरूवार गंधरात्र उत्साहत संपन्न झाली.रात्री करमणुकीचा कार्यक्रम झाला. गुरूवार गाव,दर्गा रोड व परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.ऊरूसानिमित्त मंदिरास रंगरगोटी केली आहे. नवसाला पावणारा व ऐतिहासिक ऊरूस बेंळूखीत साजरा केला जातो.यंदाही मोठ्या उत्साहत नियोजन केले आहे. आज शुक्रवारी बकरी,रात्री करमणुकीचा कार्यक्रम,शनिवारी मुख्य दिवस व कुस्त्याचा आयोजन करण्यात आले आहे. यात्रनिमित्त सर्व तयारी पुर्ण आहे.गावतील नागरिक,भाविकांनी शांततेत ऊरूसाचा लाभ घ्यावा, कोणतेही मतभेद ऊरूस काळात बाजूला ठेऊन धार्मिक विधी साजरे करावेत असे आवाहन प्रमुख नेते शंशिकात जाधव यांनी केले.

दरम्यान यात्रनिमित्त स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.यात लक्ष्मण माळी,संजय पाटील,संभाजी चव्हाण, रमेश चव्हाण,तानाजी चव्हाण,सागर पाटील,रमेश विठ्ठल चव्हाण स्वप्निळ माळी,सदाशिव चंदनशिवे, सुतार शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

बेंळूखी ता.जत येथे श्री.संदानंद पिर ऊरूसानिमित्त स्वच्छतास मोहिम राबविण्यात आली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here