जत | म्हैसाळचे पाणी आठ दिवसात जतमध्ये : आमदार विलासराव जगताप | www.sankettimes.com

0
3

जत,प्रतिनिधी :म्हैसाळ योजनेतून सोडलेले पाणी आठ दिवसात  जतच्या शिवारात येईल. 

प्रथम पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल,  अशी माहिती आमदार विलासराव जगताप यांनी दिली. 

म्हैसाळच्या पाण्यासाठी भाजप नेते प्रभाकर जाधव यांच्या फार्म हाउसवर शेतकऱ्यांची बैठक झाली.  यावेळी जि. प. सदस्या स्नेहलता जाधव,  शेगाव येथील शहाजी गायकवाड,  सागर बोराडे, कुंभारीचे सरपंच राजू जावीर, माजी सरपंच प्रकाश पाटील, एन डी शिंदे,  तानाजी पाटील,प्रताप शिंदे, अनेक गावचे सरपंच,पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार जगताप म्हणाले, ज्या गावात पाण्याविना शेतीची पिके जाळून चललेत त्यांना पिण्याच्या पाण्यानंतर प्राधान्य देण्यात येईल. 

मागील अवर्तनावेळी ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरून सुद्धा पाणी मिळाले नाही त्यांना अग्रक्रम देण्यात येईल.सर्वांची गरज पाहता पहिल्या फेरीत सर्व तलाव 25% भरून दिले जाती. जेणेकरून सर्वांची गरज भागेल.

81% शासन व 19 % शेतकरी पाणीपट्टी भरायची असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. पूर्वी एका MCFT चा दर 47 हजार होता,आता तो 11 हजार होणार आहे. ज्या लोकांच्या कॅनलच्या संदर्भात अडचणी असतील त्यासाठी 10 व 11 तारखेला नावनिहाय कॅनाल सर्व्हेक्षणासाठी मी स्वःता व अधिकारी त्या भागातील लोकप्रतिनिधी यांच्या समवेत भेटी देणार आहे. पुल, दरवाजे,अस्तरीकरणाचे विषय मार्गी लावणार आहे. 

पैशाचा तगादा न लावता लवकरात लवकर पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. दोन तीन दिवसात सांगलीत अधिकाऱ्या समवेत मिटिंग घेणार आहे.बैठकीस कुंभारी, कोसरी,वाळेखिंडी, गुळवंची, धावडवाडी, हिवरे, डोरली, शेगाव , सिंगणहळ्ळी, बनाळी, ,रेवनाळ, बागेवाडी,प्रतापपुर, तिप्पेहळ्ळी या भागातील शेतकरी उपस्थित होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here