बाज | एकावर खूनी हल्ला | www.sankettimes.com

0
3

जत, प्रतिनिधी : माधवनगरवाडी (बाज) ता.जत येथे विहिरीतील पाळीच्या वादातून एकावर खूनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात राजाराम पांडूरंग गडदे हे गंभीर जखमी झाले. ही घटना 2 एप्रिल रोजी रात्री11.30 च्या दरम्यान घडली. याप्रकरणी नारायण शिंदे यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे.

अधिक माहिती अशी, माधवनगरवाडी येथील राजाराम गडदे, मारूती गडदे व त्याचा भाऊ महादेव गडदे यांची सामाहिक विहिर आहे. विहीरीतील पाळीवरून त्यांचे सतत वाद होत होते. सोमवारी रात्री पुन्हा वाद झाला. त्यात  मारूती दऱ्याप्पा गडदे व महादेव दऱ्याप्पा गडदे यांनी राजाराम यांच्या डोकीत खोऱ्यांने मारहाण केली. त्यात राजाराम गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सांगली येथे उपचार सुरू आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here