जत | शेतकरी विरोधी, फसवे सरकार उलथवा ; अजित पवार | www.sankettimes.com

0

अजित पवार : हे सरकार पश्चिम महाराष्ट्रासाठी काहीही करत नाही

जत,प्रतिनिधी : जत पंचायत समितीच्या मनरेगात घोटाळे झालेत.त्यावर अनेक तक्रारी आहेत.आम्ही सत्तेत असताना टेंभू, ताकारी, म्हैसाळ या प्रकल्पाचे पाणी जत तालुक्याला मिळावं यासाठी प्रयत्न केला. आता या भागातील जनतेला पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं. पण सरकार काही करत नाही. हे सरकार पश्चिम महाराष्ट्रासाठी काहीच करत नाही.असा हल्लाबोल करीत समाजा-समाजामध्ये जाती-जातीमध्ये भांडणे लावून आपला फायदा करून घेणाऱ्या फसव्या, शेतकरी विरोधी भाजप सरकारला उलथवून टाका, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला ते जत येथील हल्लाबोल सभेत बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,माजी मंत्री जयंतराव पाटील,विधानसभेचे माजी सभापती दिलिप वळसेपाटील,जयदेव गायकवाड, माजी आमदार प्रकाश शेंडगे,आण्णासाहेब डांगे, विलासराव शिंदे,दिलिप पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या गळ्यात ढोल घालून स्वागत करण्यात आले.

पवार पुढे म्हणाले, सत्ताधाऱ्यांचे भानगडी बाहेर येत आहेत.2014 च्या लाटेत जे नगरसेवक होऊ शकत नाही ते आमदार झाले. जे झोपेत होते ते खासदार झाले. शिवसेना भाजपला आता कमळाबाई आणि धनुष्यबाणाऐवजी गाजर म्हणावे लागेल. या दोघांनी आपली निशाणी बदलून घ्यावी इतकी फसवणूक यांनी केली आहे.  

पवार म्हणाले,

पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय झाला आहे. इथे एकही महत्त्वाचे मंत्रीपद दिले गेले नाही. राष्ट्रवादी सत्तेत असताना सांगलीसाठी असंख्य महत्त्वाचे निणर्य घेतले आहेत. आज या भागाने भाजपला भरभरून मते दिली पण जनतेच्या पदरी निराशा आली. मंत्रालयात जनतेचा कोणीच वाली नाही. 2014 च्या लाटेत जे नगरसेवक होऊ शकत नाही ते आमदार झाले. जे झोपेत होते ते खासदार झाले. शिवसेना भाजपला आता कमळाबाई आणि धनुष्यबाणाऐवजी गाजर म्हणावे लागेल. या दोघांनी आपली निशाणी बदलून घ्यावी इतकी फसवणूक यांनी केली आहे. आम्ही सत्तेत असताना टेंभू, ताकारी, म्हैसाळ या प्रकल्पाचे पाणी जत तालुक्याला मिळावं यासाठी प्रयत्न केला. आता या भागातील जनतेला पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं. पण सरकार काही करत नाही. हे सरकार पश्चिम महाराष्ट्रासाठी काहीच करत नाही.

स्व. आर. आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवले. या सरकारने त्या योजनेचे नाव बदलून स्वच्छ भारत अभियान केले. प्रत्येक योजनेच्या बाबतीत फक्त नामकरण केले गेले. अमलबजावणी मात्र शून्य आहे.मागासवर्गीय तरुणांवर संपूर्ण देशभरात अन्याय सुरु आहे. राजस्थानमध्ये आजी-माजी मागासवर्गीय आमदारांची घरे जाळली गेली. लोकप्रतिनिधींची ही अवस्था असेल तर सामान्य माणसाचे काय?सत्तेसाठी शरद पवार साहेबांनी कधी तडजोड केली नाही. सत्ता गेली तरी चालेल पण मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देईन अशी भूमिका पवार साहेबांनी नामांतर लढ्याच्या दरम्यान घेतली होती. 

Rate Card

पवार म्हणाले, आताचे सरकार सत्तेसाठी काहीही करते.

रोजगाराचा मोठा प्रश्न सध्या राज्यात निर्माण झाला आहे. इंजिनिअरिंग केलेली मुले आज शिपायाच्या जागेसाठी फॉर्म भरत आहेत. इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांचे हे हाल आहेत तर दहावी-बारावी शिकलेल्यांचे हाल काय असतील? हे या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे होत आहे.प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, आगामी निवडणुकीत केंद्रात एकटा भाजप किंवा काँग्रेस सत्तेत येऊ शकत नाही. त्यामुळे देशाच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची भूमिका असणार आहे. यासाठी शरद पवारांना ताकद देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.सध्याचे सरकार फक्त गाजर दाखवत आहे.

आ.जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.सरकारचे धोरण गरिब,शेतकरी संपविण्याचे आहे.मोठे उद्योगपती करोडोचे कर्जे बुडवत आहेत.दुसरीकडे शासन शाळा बंद करून शिक्षण हक्कावर गदा आणत आहे.जिल्ह्यातील योजना थांबल्या आहेत.

प्रकाश शेंडगे म्हणाले, जत तालुक्यात गेल्या साडेतीन वर्षात म्हैसाळ योजनेतून कृष्णामाई एक इंचही पुढे सरकली नाही. सत्ताधारी आमदार असतानाही जतचा विकास खुंटला आहे.सुरेशराव शिंदे म्हणाले,विलासराव जगताप हे सर्वात अकार्यक्षम आमदार आहेत. त्यांच्या काळात 40 कोटींचा मनरेगा कामात घोटाळा झाला. पूर्व भागातील जनतेला कर्नाटक मधून पाणी देण्याचे गाजर दाखविले जात आहे. त्याएेवजी नगारटेक योजना पूर्ण करावी असे आवाहन केले.

प्रस्ताविक तालुका अध्यक्ष बसवराज धोंडमणी तर आभार डॉ.पराग पवार यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीचे जत तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.

जत येथील हल्लाबोल सभेत बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बाजूस प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, दिलिप वळसेपाटील, जंयतराव पाटील, प्रकाश शेंडगे, सुरेशराव शिंदे समोर उपस्थित जनसमुदाय

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.