जत,प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ‘हल्लाबोल यात्रा’ दुष्काळाने कायमच ग्रासलेल्या जत तालुक्यात आली.उन्हाच्या झळा लागत असतानाही हजारो लोक या सभेस आले होते.या सभेस माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,माजी सभापती दिलीपराव वळसे-पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,महिला प्रदेशाध्यक्ष सौ.चित्रा वाघ,माजी मंत्री आण्णासो डांगे,माजी आ.प्रकाश शेंडगे,जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, दिलीपतात्या पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
आ.पाटील यांनी आपल्या चौफेर भाषणात भाजपाच्या सरकारचा खरपूर समाचार घेतला. आ.पाटील म्हणाले,मोठ्या अपेक्षेने आपण राज्यात,व देशात भाजपला सत्तेत बसविले. मात्र त्यांनी जनतेची घोर निराशा केली आहे. या सरकारने निवडणुका आल्यानंतरच आपल्या भागात पाणी सोडून दुष्काळी जनतेची चेष्टा केली आहे.आपल्या भागात पाणी सोडण्याचा स्व.आर.आर.आबांचा कायम आग्रह असायचा.आम्ही टंचाई निधीतून बिले भरत होतो. मात्र हे सरकार अगोदर पैसे भरण्याचा दम भरत आहे.या भागात चौपदरीकरणांच्या कामाशिवाय कोणतेही काम दिसत नाही.आपल्या तालुक्यातील सर्व तलाव भरून देण्याची या मंडळीची मोठी थाप आहे..या सरकारला धक्का द्यावा लागेल.
माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शना खाली माजी सभापती सुरेशराव शिंदे,अँड.चन्नाप्पा होर्तीकर,रमेश पाटील,खतीब मन्सूर,अँड.बसवराज दोडमनी,उत्तम चव्हाण, सौ.मीनाक्षी अक्की,उपसभापती शिवाजीराव शिंदे,उपनगराध्यक्ष आप्पासो पवार,मच्छिन्द्र वाघमोडे,डॉ.पराग पवार,व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही भव्य सभा यशस्वी केली.
या सभेचे वैशिष्ट्य हे ठरले की,या सभेत अनेक वक्त्यांनी स्व.राजारामबापू पाटील यांच्या दुष्काळी भागातील जनतेशी आलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा मोठ्या आदराने वारोवर उल्लेख केला गेला.
जत येथील हल्लाबोल सभेत बोलताना आ.जंयतराव पाटील व मान्यवर