सव्वाचार लाखाचा गांजा जप्त : एकजण ताब्यात
संख,वार्ताहर : संख ता.जत येथील ऊसाच्या शेतात लावलेल्या गांज्या शेतावर उमदी पोलिसांनी छापा टाकत 104 झाडे जप्त करत 4 लाख वीस हाजाराचा मुद्देमाल जप्त केला.याला गुरूबसू हणमंत बिराजदार ताब्यात घेतले आहे.संख परिसरातील ही मोठी कारवाई समजली जात आहे.
अधिक माहिती अशी, संख हद्दीतील गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील गुरूबसू बिराजदार यांने आपल्या ऊसाच्या शेतात गांज्याची झाडे लावल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याद्वारे मिळाली होती. त्या आधारावर डिवायएसपी नागनाथ वाकुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलिस निरिक्षक भगवान शिंदे यांच्या पथकांने ऊस शेतात छापा टाकला.त्यात 4 ते 5 फुटाची 104 झाडाची 87 किलो वजनाची 4 लाख 20 हाजार किंमतीची गांज्याची विना परवाणा लावलेली झाडे आढंळून आली.याप्रकरणी झाडे ताब्यात घेतली आहे.पथकात स.पो.फौजदार गरड,कुंभारे,गोदे,पाटील सामील होते.
संख येथील ऊसाच्या शेतात लावलेल्या गांज्या शेतावर छापा टाकून संशियत आरोपीसह मुद्देमाल जप्त केला.