संख,वार्ताहर : भिवर्गी ता.जत येथील चाँदबी आदमबादशहा सनंदी यांच्या राहत्या घरी गँसचा स्फोट होऊन घराचे एक लाख रूपयाचे नुकसान झाले. घटना सोमवारी सकाळी 9.30 च्या दरम्यान घडली.
भिवर्गी येथील चाँदबी नदाफ भाऊ रमजान व महिबूब नदाफ असे एकत्र राहतात.सकाळी रमजान व महिबूब मेंढ्या राकण्यासाठी रानात गेले होते.घरात असलेल्या चॉदबी गँसवर चहा करत असताना गँस लिकेज झाला त्यामुळे पाईपला आग लागली. आग पाहताच चॉदबीने प्रंसगावधान राखत घराबाहेर पळाली.आग सिंलेडर पर्यत गेल्याने काही क्षणात स्फोट झाला.घराच दुसरे कोणीही नसल्याने जिवितहानी टळली.मात्र स्फोट झाल्याने घर उद्धवस्त झाले.घरातील संसारउपयोगी साहित्य, धान्याची पोती,मेंढी विकलेले रोख दहा हाजार,सोन्याची भोरमाळ जळून खाक झाली आहे.सुमारे एक लाख रूपयाचे नुकसान झाले आहे.दरम्यान माहिती देऊनही रात्रीउशिरापर्यत एकही अधिकारी पंचनामा करण्यासाठी फिरकला नाही. सनदी कुंटुबिय पुर्णत: उघड्यावर आले आहे. समाजहितासाठी काम करणारे व संस्थानी मदत करावी असे आवाहन करण्यात आले.
भिवर्गी ता.जत येथील चाँदबी सनंदी यांच्या घरात गँस स्फोट होऊन मोठे नुकसान झाले.