बोर्गी,वार्ताहर : बोर्गी(ता.जत) येथील सहारा कला क्रीडा व्यायाम सांस्कृतिक मंडळाला कास्ट्राइब कमर्चारी महासंघ सांगली जिल्हा यांच्या वतीने “आदर्श संस्था ”
पुरस्कार देवून गौरविण्यात आले.बोर्गी येथील सहारा मंडळाने गेल्या चार
वर्षापासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामे केली आहे.लोकहितासाठी विविध उपक्रम या संस्थेकडून राबविले जातात.जनहिताच्या या कामाची दखल घेऊन त्यांना
हा पुरस्कार आमदार सुरेश खाडे व जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला आहे. सांगली येथील वालचंद महाविद्यालयाच्या सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
यामुळे मंडळाचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.यावेळी बोलताना सहारा मंडळाचे अध्यक्ष दावल पुळुजकर म्हणाले,जनहित डोळ्यासमोर ठेऊन जनतेला अभिप्रेत असलेली कामे आम्ही या मंजळाच्या माध्यमातून करतो आहोत.बोर्गीसह परिसरातील समाजउपयोगी कामात आमच्या मंडळाचे कार्यकर्ते अग्रस्थानी असतात.
बोर्गी : येथील सहासा कला क्रिडा व्यायाम मंडळास आदर्श संस्था पुरस्कार प्रदाध करताना आ.सुरेश खाडे,जि.प.अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख व मान्यवर