गुड्डापूर | 4 एप्रिलला गुड्डापूर येथे शिक्षकाचा यल्लगार,भव्य निर्धार मेळावा | www.sankettimes.com

0
2

D.C.P.S.व N.P.S.धारकांचा भव्य निर्धार मेळावा

जत,प्रतिनिधी :1 नोव्हेंबर 2005 पासून शासकीय सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना1982 नागरी जुनी पेंशन योजना बंद करून अन्याय केला आहे. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे व नंतरचे असे शासकीय कर्मचाऱ्यांचे दोन भाग करत 2 नोव्हेंबर 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांबाबत अत्यंत उदासीन धोरण राबविले जात आहे.पेंशन नसल्यामुळेअनेक मृत कर्मचाऱ्यांचे कुटुंबिय मरणयातना भोगत आहेत. मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर वेठबिगारीची वेळ आली आहे. त्या कुटुंबाला शासनाने आज पर्यंत कसलीही मदत केली नाहीं. त्यांची कपात करून घेतलेली रक्कम सुद्धा दिली जात नाही. शासनाने या कुटुंबीयांचा विचार करून पेंशन योजना लागू करावी.

1982 च्या जुन्या पेंशन योजनेत कर्मचाऱ्यांच्या पगारातून कसलीही कपात न करता कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यास त्यास पेंशन मिळते. तर 1नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांची नवीन अंशदान पेंशन योजना (डीसी पी एस)या योजनेच्या नावाखाली कर्मचाऱ्याच्या एकूण पगाराच्या 10 टक्केच रक्कम कपात करून घेतली जाते व 90 टक्केच पगार दिला जातो .आणि पेंशनही दिली जात नाहीं. नवीन अंशदान परिभाषित पेंशन योजना अंमलात आणतांना विधानसभा तसेच विधानपरिषदेमध्ये कोणताही प्रस्ताव मांडण्यात आलेला नाही. म्हणजेच कसलाही कायदा न करता कर्मचाऱ्याचा सारासार विचार न करता 31 ऑक्टोबर 2005 रोजी कर्मचाऱ्याच्या हक्कावर गदा आणणारा, कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना अंधाऱ्या खाईत लोटणारा शासन निर्णय काढण्यात आला.

या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्याच्या एकूण पगारातून 10 टक्के रक्कम कपात करायची तेवढाच शासन हिस्सा द्यायचा व त्यावर चालू दाराने व्याज द्यायचा,आणि त्याचा लेखाजोखा संबंधित कर्मचार्यांना द्यावयाचा आहे ;परंतु गेल्या 13 वर्षात केवळ कर्मचाऱ्याच्या पगारातून 10 टक्के रक्कम कपात करून घेतली जाते शासन हिस्सा दिला नाही आणि व्याजही दिले नाही. वेळोवेळी त्याचा हिशोबही दिला जात नाही. 

1 मे 2010 च्या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यास दिलेला निवृत्ती वेतनाचा लेखा क्रमांक कर्मचारी बदलीने अथवा बढतीने स्थलांतरित झाला तरी लेखा क्रमांक न बदलता संबंधित जिल्हा परिषदेला लेखा क्रमांक व रक्कम वर्ग करावी असे आहे ;परंतु आजपर्यंत शेकडो कर्मचारी जिल्हा बदलीने गेले आणि आले परंतु त्यांची रक्कम व लेखा क्रमांक संबंधित जिल्हा परिषदेला वर्ग केला गेला नाही उलट जिल्हा बदलीने आलेल्या कर्मचार्यांना नवी खाते क्रमांक देण्यात आले. आणि कपात सुरू केली.

या योजनेनुसार सेवा निवृत्ती नंतर एकूण जमा रकमेच्या 60 टक्के रक्कम कर्मचाऱ्यास रोख स्वरूपात दिली जाईल व 40 टक्के रक्कम जीवन विमा कंपनीकडे गुंतवली जाईल.40 टक्के रक्कम कर्मचार्यास मिळणार की नाही याचा कसलाही उल्लेख नाही.

डी सी पी एस ही अत्यंत घातक व फसवी योजना आहे. ही योजना राबवण्यास गेल्या 13 वर्षात पूर्णपणे सरकार अपयशी ठरले आहे. या योजनेनुसार कर्मचाऱ्यास भविष्य निर्वाह निधीचेही खाते काढता येत नाही. या अन्यायकारी योजनेच्या विरोधात 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यात असंतोष खदखदत आहे .कर्मचाऱ्यांवर शासनाने असा कोणताही अन्यायकारी शासन निर्णय लादू नये.

या योजनेच्या विरोधात महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेने मूक मोर्चा, धरणे आंदोलन,आक्रोश मोर्चा,मुंडन आंदोलन केले. 18 डिसेंबर 2017 रोजी 60 हजार कर्मचारी नागपूर येथे मुंडन आंदोलन केले.यावेळी मुख्यमंत्री यांनी येत्या 3 महिन्यात पेंशन विषयी ठोस निर्णय घेऊ असे शिष्टमंडळास सांगितले;परंतु आता पर्यंत कसलाही निर्णय घेण्यात आलेला नाही .महाराष्ट्र शासन मुद्दाम या गोष्टी कडे डोळेझाक करत आहे .

केंद्र सरकारने आपल्या डी सी पी एस कर्मचार्यांना सदर योजना लाभाची नसल्याने जुनी च कुटुंब निवृत्ती वेतन योजना 2009 ला लागू केली त्याला अनुसरून 5 मे 2011 ला उत्तरप्रदेश,9 डिसेंबर 2011 ला उत्तराखंड,9 मे 2013 ला राजस्थान आणि बिहार मध्ये कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली.आमचं महाराष्ट्र शासन आर्थिक कारण पुढे करते.आमच्या महाराष्ट्राची आर्थिक स्थिती बिहारपेक्षा वाईट आहे का???

पेंशन योजनेच्या अंमलबजावणीतील गोंधळामुळे अंधकारात लोटलेले भविष्य प्रकाशमय करण्याचा निर्धार करत जुनी पेंशन योजना मिळवण्याचा संकल्प करण्यासाठी जत तालुक्यातील गुड्डापूर या ठिकाणी 4 एप्रिल 2018 रोजी तालुकास्तरीय निर्धार मेळावाआयोजित केला आहे. या मेळाव्यास 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेले प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, तलाठी, वन विभागातील कर्मचारी जुन्या पेंशनचा निर्धार करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यास सहकुटुंब उपस्थित राहावे, असे विनम्र आवाहन महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन हक्क संघटन,सांगली शाखा जत ने केले आहे.

या प्रसंगी विरेश हिरेमठ,बालाजी पडलवार,गुरुबसू वाघोली,दिलीप वाघमारे, तानाजी कांबळे, ज्ञानेश्वर पांपटवार,शिवाजी आवताडे,रविंद्र सतारी,श्रावण कोरे,अशोक आंधळे,निरंजन नागरे,सूर्यकांत राठोड,प्रकाश माळी,परमेश्वर मुंढे,राजकुमार करडी,व्हन्मुखे सर,रावसाहेब चव्हाण,अभिजित मालगुंडे, संतोष राठोड,श्रीरंग सुर्यवंशी, दिगंबर चाटे,रामप्रसाद घुगे,प्रसाद मिरगणे,स्वप्नील नेमाडे,शरद कारंडे,राजेश देबाजे,विठ्ठल जाधव,कांतेश सन्नोळी तानाजी कांबळे,शिवाजी वडते,मनोज सावरकर,सुधीर गायकवाड ,सुशांत गरदडे,बाळासाहेब जायभाये,संजय उकिरडे ,बजरंग जाधव,अविनाश मोथरकर,विशाल कोमावार,रेवन यादव,पी.डी.राठोड,दिलीप कांबळे,रघुनाथ कडोलकर,एस .आर.होसमनी ,

राजीव पाटिल,रामचंद्र घुगे,श्रीरंग सुर्यवंशी,शिवप्रसाद मिरगणे,अत्तार सर,अशोक गरकल,विनोद जाधव,कोलाटे सर ,संदिप कांबळे,गौरीश नवराज,काशिनाथ हिटनळळी,श्रीमंत सोनकनळळी,एम. डी. कट्टीमनी, महादेव भोसले, एल. एस. जंगम,रवी वारद ,बापू मुंडे ,शशिकला पाटील लायव्वा खोत भारती हणगांडी,अफ्रिन मोमीन,सौ करडी मॅडम,अनिता पाटील इत्यादी उपस्थित होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here