जत,प्रतिनिधी :उपक्रमशील शिक्षक दिलीप वाघमारे यांना शाळेतील व सामाजिक योगदानाबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
जत येथील दुष्काळभागातील कर्नाटक सिमाभागाजळ माळरानातील जि.प.प्रा.मराठी शाळा बाबरवस्ती(पांडोझरी)आसंगीतुर्क केंद्रातील प्रयोगशील शिक्षक दिलीप वाघमारे यांना कास्ट्राईब कर्मचारी महासंघ,महाराष्ट्र राज्य, सांगली जिल्हाच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानपुर्वक आमदार सुरेश खाडे,जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख व जेष्ट अभिनेता विलास रकटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
श्री.दिलीप मारोती वाघमारे हे जि.प.शाळा बाबरवस्ती (पांडोझरी) सहशिक्षक आहेत. त्याच्या आज पर्यत शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये बहूमोल योगदान दिले आहे.त्यांनी शैक्षणिक मासिके व वृत्तमान पञात लेख व कविता लेखन करतात.साविञीबाई फुले विशेषांक2017 स्वतः संपादक असून विशेषांक प्रकाशीत केला आहे.अनेक शाळेत ज्ञानरचनावाद,बोलक्या भिंती व शाळेची शैक्षणिक गुणवत्ता दर्जेदार केली आहे. त्याच्या शाळेतील वृक्षसंगोपन हा उपक्रम सलग दोन वर्ष सुट्टीत गावाकडे न जाता दुष्काळीभागात पाण्याचे खुप समस्या असल्यामुळे ते आपल्या शाळेतील झाडे जगवण्यासाठी आपल्या पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या मदतीने सुट्टीत ही झाडाना कँनने पाणी घालणारे प्रयोगशील शिक्षक आहेत. त्याचे काम प्रेरणादायी आहे. त्यांची दखल घेऊन हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
उपक्रमशील शिक्षक दिलीप वाघमारे आमदार सुरेश खाडे,संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार स्विकारताना