येळवी | “तुला पण बाशिंग बांधायचे” चित्रपटातील कलाकार आज येळवीत | www.sankettimes.com

0
6

येळवी, वार्ताहर : येथील सानिका ज्वेलर्सचे मालक सुभाष चव्हाण निर्मिती असलेल्या “तुला पण बाशिंग बांधायचे ” या चित्रपटाच्या प्रमोशन येळवी येथील श्रीसमर्थ शिवप्रभु हायस्कूल येथे आज ठेवण्यात आले आहे.

या चित्रपटातील सर्व कलाकार व संपुर्ण टीम आज येळवीत सिनेरसिकांशी संवाद साधणार आहेत.दुष्काळी जत तालुक्यातील सानिका ज्वेलर्सचे मालक सुभाष चव्हाण यांनी आपला सोने-चांदीचा व्यवसाय चालवित या चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. शिवाय त्याचा मुलगा सुशांत चव्हाण या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्राची सुरूवात केली आहे. परिस्थितीशी दोन हात करत वेगळेपण जपलेल्या सुभाष चव्हाण यांचा नावलौकिक झाला आहे. सामान्य माणूस आज मराठी चित्रपटाचा निर्माता झाला आहे.

जत तालुक्यातील सिनेरसिकांनी येळवी येथे उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here