जत,प्रतिनिधी : कर्नाटक सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत लिंगायत समाजाला संवैधानिक मान्यता देत लिंगायत समाजाची मागणी पुर्ण केली आहे. तसाच निर्णय महाराष्ट्र शासनाने घ्यावा अशी मागणी लिंगायत समाजाचे नेते तुकाराम माळी यांनी केले.
माळी म्हणाले,कर्नाटकातील लिंगायत समाजाने केलेला कडवा संघर्षाचे फळ मिळाले आहे.कर्नाटकचे जलसंपदा मंत्री. एम.बी.पाटील यांनीही यासाठी मोठे प्रयत्न केले होते.महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात लिंगायत समाज आहे.त्यामुळे महाराष्ट्र शासनाने निर्णय घ्यावा.
कर्नाटकाच्या निर्णयावर केंद्रसरकारने लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता दिलीतर लिंगायताना धार्मिक अल्पसंख्याक म्हणून शिक्षण,नोकऱ्यांत आरक्षण मिळणार आहे.त्यामुळे समाजाचा सर्वागिंण विकास होण्यास मदत होईल.महाराष्ट्रातही लवकर निर्णय व्हावा अन्यथा राज्यभर अंदोलन करावे लागेल असा इशाराही माळी यांनी दिला.





