रवींद्र कांबळे याची रहात्या घरी गळफास घेवून आत्महत्या

0
4

जत,प्रतिनिधी : जत शहरातील वसंतगर येथील रवींद्र बाळू कांबळे (वय 25) याने रहात्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान  घडली. आत्महत्या करण्यामागील नेमके कारण समजू शकले नाही.याप्रकरणी जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की,रवींद्र कांबळे हे फँब्रिकेशनचे काम करत होते. काम नसल्यामुळे ते आज घरीच होते.त्यांची पत्नी कामासाठी बाहेर गेली होती.त्यांच्या दोन लहान मुली व वडील घराबाहेर होते. घरात कोणीही नाही असे पाहून त्यानी गळफास घेवून आत्महत्या केली. सदरची घटना त्यांची पत्नी कामावरून परत घरी आल्यानंतर त्यांच्या लक्षात आली आहे. मागील पंधरा दिवसांत या परिसरातील दोन तरुणांनी यापूर्वी आत्महत्या केल्या आहेत. कांबळे यांची ही तिसरी आत्महत्या आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जत पोलीस करत आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here