जत,प्रतिनिधी : जत शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या शिवाजी चौक येथील
गजानन उर्फ राजू बाळासाहेब यादव यांच्या घरात सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर विशेष पथकाने छापा टाकून तीन लाख 22 हाजार 254 रुपयाचा मुद्देमाल जप्त करत सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे.तर एक आरोपी फरारी झाला आहे. जिल्हा पोलिस प्रमुखाच्या विशेष पथकाने जत तालुक्यातील सर्वात मोठी कारवाई केली आहे.शनिवारी सायकांळी साडेचार वाजता हि कारवाई केली.
जत तालुक्यातील अवैद्य धंदे बंद करण्याचा आदेश जिल्हापोलिस प्रमुखांनी दिले आहे. त्या पाश्वभुमीवर जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैद्य धंदे बंद करण्यात आले आहे. तरीही जत शहरात जुगार अड्डा मालक शहनशहा अबुबकर मेस्री (रा. बदाम चौक सांगली) हा राजू यादव यांच्या घरातून जत शहरासह तालुक्यात बेकायदेशीर जुगार व्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिस प्रमुखाच्या पथकाला मिळाली होती.त्या आधारावर पथकाने शनिवारी सायंकाळी चार वाजता राजू यादव यांच्या घरावर छापा टाकला.त्यात मिस्ञी पळून जाण्यात यशस्वी झाला,तर
गजानन उर्फ राजू बाळासाहेब यादव,प्रमोद सुरेश पवार,सौरभ अशोक माने,सचिन विश्वास माने(सर्वजण रा. शिवाजी चौक, जत),गारिफ बाबासाहेब अपराज,(रा. मंगळवार पेठ, जत),राजू सिद्राम कलाल (रा. खाटिक गल्ली,जत) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.तर शहेनशाह बाबूकर मिस्ञी रा.बदाम चौक,सांगली हा फरारी झाला आहे. छाप्यात रोख 44 हाजार 910,71 हाजार रुपये किंमतीचे 8 मोबाईल, तीन मोटार सायकली असा तीन लाख 22 हाजार 254 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.विशेष पथकाचे सा. पोलिस निरिक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा टाकण्यात आला. मध्यवर्ती ठिकाणी पडलेल्या या छाप्यामुळे शहरात खळबंळ उडाली आहे.पुढील तपास जत पोलिस करत आहेत.