संकेत टाइम्सला आकाशी उडण्याचे बंळ मिळो. विक्रमसिंह सांवत; संकेत टाइम्स काढलेल्या विशेष पुरवणीचे प्रकाशन

0
5

डफळापूर, वार्ताहर : दैनिंक संकेत टाइम्सला आकाशी उडण्याचे बंळ मिळो,जतचं दैनिंक असलेले संकेत टाइम्सने आता कलर आवृत्ती चालू करावी असे प्रतिपादन कॉग्रेस नेते तथा जिल्हा बँक संचालक विक्रमसिंह सांवत यांनी केले.ते डफळापूर येथील कार्यक्रमात बोलत होते. कॉग्रेसचे ताकतवान नेते विक्रमसिंह सांवत यांच्या वाढदिवसानिमित्त आज दैनिंक संकेत टाइम्सने काढलेल्या विशेष पुरवणीचे प्रकाशन सांवत यांच्या हस्ते डफळापूर येथे करण्यात आले. जतचे भावी आमदार म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते असे जनतेची तळमळची जाणिव असलेले, तरूण नेते विक्रमसिंह सांवत हे जत तालुक्याचे भविष्य उज्वल करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याचे फलित म्हणून विक्रमसिंह सांवत यांनी कॉग्रेसला तालुक्यात नंबर वन बनविले आहे. नगरपालिका,बाजार समिती,सह तालुक्यातील सुमारे शंभरावर ग्रामपंचायती,सोसायटीवर विक्रमसिंह दादा गटाची सत्ता आहे.जेथे

सत्ता तेथे विकास हा लौकिक सांवत यांनी मिळविला आहे.असे लोकमान्य नेत्यांच्या वाढदिनी संकेत टाइम्सकडून विशेष पुरवणी काढण्यात आली आहे.आज सकाळी डफळापूरचे कॉग्रेस नेते, तथा दत्त पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी यांच्या पुढाकाराने विक्रमसिंह सांवत यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड,व यशस्वी विद्यार्थ्याचे सत्कार, वाढदिवस अशा संयुक्त कार्यक्रमानिमित्त सांवत डफळापूर येथे आले होते.यावेळी बाजार समिती सभापती अभिजित चव्हाण, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,जयाजी शिंदे,अजित खतीब,अशोक सवदे, अजित भोसले, गणेश गिड्डे, प्रविण पाथरूट,गणेश वठारे,रांजेद्र पोतनीस, महेश चव्हाण, मनोज पोळ,अमोल संकपाळ,अमित नदाफ,अभिजित माळी, पप्पू परीट,महादेव अथणीकर,उद्योगरत्न संकपाळ,आदि मान्यवर उपस्थित होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here