उमदी,वार्ताहर:
उमदी येथे अप्पर तहसील कार्यालय व्हावे या मागणी वर ठाम राहून येथील मतदारांनी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीवर बहिष्कार टाकले होता. मात्र पुन्हा निवडणूक आयोगाने उमदी ग्राम पंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. येत्या दि.5 ते 10 फेब्रुवारी अखेर नामनिर्देशन पत्रे दाखल करणे, 12 फेब्रुवारी छाननी, 15 फेब्रुवारी रोजी अर्ज माघार व याच दिवशी चिन्ह वाटप तसेच 25 फेब्रुवारीला मतदान तर 26 ला निकाल होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.
गत निवडणूकी वेळी बहिष्कार टाकला होता. मात्र यावेळी कसल्याही परिस्थितीत निवडणूक होणार आहे. गेल्या वेळी उमदी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. होऊ घातलेल्या निवडणूकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी भाजपा अशा तीन्ही प्रमुख पक्षानी पूर्ण तयारी सुरू केली आहे. यात कोणता उमेदवार उभे केल्यास कोणाला किती यश मिळेल यासाठी पक्ष प्रमुखानी उमेदवारांची चाचपनी सुरु आहे.
पाणी संघर्ष समितीने ग्रामदैवत वीर मलकारसिद्ध देवाच्या यात्रा व दहावी/बारावीची परीक्षा ही कारणे दाखवून ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे. निवडणुका फेब्रुवारी महिन्यात निश्चित आहे. तर उमदी गावची यात्रा व परीक्षा मार्च महिन्यात होणार असल्याने त्यांची मागणी स्विकारता येत नसून कोणत्याही स्थितीत निवडणूक पुढे ढकलण्यात येणार नसल्याची माहिती तहसीदार अभिजीत पाटील यांनी दै. संकेत टाईम्सशी बोलताना दिली.