बिंळूर : बिंळूर ता.जत येथील महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांचे श्रंध्दास्थान असलेल्या श्री. काळभैरव देवाच्या यात्रेला मोठ्या उत्साहात प्रांरभ झाला. श्रीच्या पालखीचे मंगळवारी आगमन झाले. बुधवारी नैवेद्याच्या कार्यक्रमापासून यात्रेस सुरूवात झाली,आज शुक्रवारी महत्वाचा हरबंडीचा उत्सव हा महत्वाचा धार्मिक कार्यक्रम आहे.व रविवारी मिरवणूक असा कार्यक्रम होणार आहेत. महाराष्ट्रातील महत्वाचे असणाऱ्या बिंळूर येथे काळभैरवाचे जागृत देवस्थान आहे. मोठ्या भाविकांचे श्रंध्दास्थान असलेल्या या यात्रेला लाखो भक्ताचा महासागर उपस्थित असतो. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत अनेक धार्मिक कार्यक्रम रेलचेल असते. स्थानिक देवस्थान कमिटी व नागरिक मोठ्या प्रमाणात यात्रा भरवतात.