जतसह तालुक्यात नववर्षाचे जोरदार स्वागत

0
3

जत, प्रतिनिधी :2017 या मावळत्या वर्षाला ‘बाय बाय…’ करतानाच नव्या वर्षाच्या स्वागताचा दणकेबाज सोहळा थर्टीफर्स्टच्या मध्यरात्री चांगलाच रंगला. अवघ्या तालुकाभरात उत्साही व जल्लोषमय वातावरणाला रविवारी मध्यरात्री उधाण आले. यावेळी ठिकठिकाणी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. अनेक ठिकाणी डॉल्बीच्या तालावर बेधुंद नाचत मावळत्या वर्षाला निरोप देत 2018 या नव्या वर्षाचे दणक्यात  स्वागत करण्यासाठी अवघी तरुणाई रस्त्यावर उतरली होती. जत,उमदीसह अनेक गावात दारू नको दुध प्या म्हणून दुध वाटत नववर्ष साजरे करण्यात आले. जत शहर परिसरासह तालुक्यातील विविध तरूण मंडळे, सामाजिक संस्था, संघटना यांनी थर्टीफर्स्टच्या विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. तरूणाईने तर ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले होते. जत शहर व परिसरातील विविध हॉटेल्स, ढाबे यासह ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई केली होती, त्यामुळे परिसर विद्युत रोषणाईने फुलून गेला होता. थर्टीफर्स्टची रात्र म्हणजे फुल्ल टू धमालच ठरली. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातील हॉटेल्स, ढाबा चालकांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.जत येथे सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी दारू नको दुध प्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उमदीही काही तरूणांनी असा कार्यक्रम घेतला. रात्री बारापर्यत जत शहरासह तालुक्यातील अनेक गावात तरूण,नागरिक जागे होते.

उमदीत नववर्षाचे स्वागत दारू नको दुध प्या असा संदेश देत करण्यात आले. तरूणांना दुधाचे वाटप करताना सा. पोलिस निरिक्षक भगवान शिंदे, प्रविण संपागे आदि

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here