अलकुड : मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक क्रिडा स्पर्धेस प्रांताधिकारी नागेश गायकवाड व संस्थापक अध्यक्ष मोहन माळी यांच्या हस्ते सुरूवात झाली.प्रांरभी विद्यार्थी विविध नेत्रदिपक परफार्म सादर करून कार्यक्रमास सुरूवात झाली.यावेळी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.कब्बड्डी, खो-खो, धावणे,योगा,आदि स्पर्धा गेल्या दोन दिवसापासून सुरू आहेत. आज त्यांचा अंतिम दिवस आहे. विजयी स्पर्धकांना आज उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण होणार आहे.



