जत,प्रतिनिधी : येथील यल्लम्मा देवी यात्रेत ”यल्लम्मा आईच्या नावाने चांगभल,उदं आई उदं” म्हणत वाद्याच्या गजरात दुसऱ्या दिवशी लाखो भाविकांनी देवीस नैवद्य अर्पण केला. मानाचा नैवद्य अर्पण केल्यानंतर भाविकांची दिवसभर रांग लागली होती. लाखावर भाविक दाखल झाल्याने वाहतुकींची कोंडी होत आहे. शिवाय परिसरात पुर्ण जमिनीचा भाग असल्याने धुरळ्यांने भाविकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. दुरवरून येणाऱ्या भाविकांची पोलिसांकडून अडवणूक करण्यात येत असल्याने भाविकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
श्री. यल्लम्मा देवी यात्रेत दुसऱ्या दिवशी नैवेद्य दाखविण्याची विधिवत परपंरा आहे. मानाचा नैवद्य अर्पण केल्यानंतर भाविक आपला नैवद्य अर्पण करतात.लाखो भाविकांनी देवीस नैवद्य अर्पण केला. दर्शनासाठी दिवसभर भक्तांची गर्दी उसळली होती.यात्रेत दोन लाखावर भाविक दाखल झाले होते. त्यामुळे सतत वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे लांबवर वाहनाच्या रांगा लागत होत्या.पोलिस कर्मचारी वाहतूक कोंडी हटविताना दिसत नव्हते. काही पोलिसांकडून भाविकांचा शहराबाहेरील मार्गावर अडवणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र यात तातडीने लक्ष घालत पोलिस निरिक्षक राजू तहसिलदार यांनी वाहतूक व्यवस्थेकरिता कर्मचाऱ्यांना जागेवर थांबण्याच्या सुचना दिल्या आहेत.







