जत,प्रतिनिधी : जत नगरपालिका निवडणूकीसाठी मंगळवारी 40 अर्ज दाखल झाले. अगोदरचे तिन असे आतापर्यत 43 अर्ज दाखल झाले आहेत. त्यात नगराध्यक्ष पदासाठी एक व नगरसेवक पदासाठी 42 अर्ज दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेस व भाजपचे उमेदवार घोषित झाल्याने त्याचेच सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत. कॉग्रेसकडून आज एबी फॉर्म दिला जाणार असल्याने आज कॉग्रेसचे अर्ज दाखल होतिल. शेवटचा दिवस असल्याने गर्दी वाढणार आहे. भाजपकडून थेट नगराध्यक्ष पदासाठी डॉ. रेणुका आरळी यांनी अर्ज दाखल केली. त्यांची उमेदवार यादी मंगळवारी घोषित करण्यात आली. कॉग्रेसकडून इच्छूंकाची संख्या मोठी असल्याने बंडखोरी टाळण्यासाठी अंतिम क्षणी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
प्रभाग वार दाखल झालेले अर्ज
प्रभाग 1.वनिता अरूण साळे (राष्ट्रवादी कॉग्रेस)
संतोष मधूकर देवकर(राष्ट्रवादी कॉग्रेस), आप्पासो दुर्गाप्पा पवार(राष्ट्रवादी कॉग्रेस)
प्रभाग 2. कल्लाप्पा हणमंत पाथरूट (भाजप),विजयालक्ष्मी चंद्रकांत गुड्डोडगी (भाजप)
प्रभाग 3.प्रमोद सदाशिव हिवरे(भाजप),दिप्ती उमेश सांवत (भाजप),निशा महेश सांवत (भाजप)
प्रभाग 4.श्रींरग आंनदा सनदी(कॉग्रेस), आंनद कबीर कांबळे (राष्ट्रवादी कॉग्रेस),वैशाली कुमार जमदाडे(राष्ट्रवादी कॉग्रेस), श्रीदेवी मल्लिकार्जून सगरे (भाजप)
प्रभाग 5.हयातबी काशीम गंवडी (राष्ट्रवादी कॉग्रेस),
शाहीन सलिम गंवडी (भाजप), गजानन बाळासो यादव(अपक्ष),गजानन बाळासो यादव (भाजप), प्रमोद सुरेश पवार(भाजप)
प्रभाग 6. रेखा बाळू साळे (राष्ट्रवादी कॉग्रेस), प्रियांका सुरज साळे(भाजप), गणपती तम्माण्णा माळी (राष्ट्रवादी कॉग्रेस), विजय शिवाजी ताड(भाजप)
प्रभाग 7.विमल धोंडिराम कोळी (राष्ट्रवादी कॉग्रेस), बाळाबाई पांडूरंग मळगे (कॉंग्रेस),सचिन मधूकर शिंदे (राष्ट्रवादी कॉग्रेस), रणधीर दिनानाथ कदम(अपक्ष),स्वप्निल सुरेश शिंदे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), राहूल शंकरराव मोरे(भाजप), प्रकाश कृष्णा व्हनमाने(कॉंग्रेस)
प्रभाग 8.प्रकाश आप्पासो माने(भाजप),सुरेश नामदेव पाटील (अपक्ष),
प्रभाग 9.सुनिता संजय गावडे(भाजप),सकीना दस्तगीर नदाफ (आयएनसी),मोहन सुभाष कुलकर्णी(कॉग्रेस), प्रमोद गुण्णाप्पा डोळ्ळी(अपक्ष)
प्रभाग 10.आप्पासो रामू कोळी (राष्ट्रवादी कॉंग्रेस), हेमलता महेश निकम (राष्ट्रवादी कॉग्रेस), विमल भिमराव वास्टर (भाजप), कोमल शिवराम शिंदे (कॉंग्रेस)
फोटो
थेट नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या अधिकृत्त उमेदवार डॉ. सौ. रेणुका आरळी यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आ. विलासराव जगताप,जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील आदि उपस्थित होते.