जत,प्रतिनिधी : जत नगरपालिका निवडणूकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अाज शेवटचा दिवस उरला आहे.कॉग्रेस, भाजप व राष्ट्रवादी कॉग्रेस असा तिंरगी सामना रंगणार आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस,भाजपने उमेदवारी घोषित करून आघाडी घेतली आहे.कॉग्रेसकडून उमेदवार घोषित करण्यास विलबं झाला आहे. आज थेट पक्षाचे एबी फॉर्म उमेदवारीना दिला जाण्याची शक्यता आहे.
कॉग्रेसकडे इच्छूंकाची संख्या मोठी असल्याने बंडखोरी टाळण्यासाठी कॉग्रेस नेत्याकडून असा प्रयोग राबविला जाण्याची शक्यता आहे. कॉग्रेसकडे प्रत्येक प्रभागात दोन पेक्षा जादा सक्षम इच्छूंक आहेत. त्यामुळे उमेदवारी देताना नेत्यांची दमछाक होत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉग्रेस व भाजपकडून बंडखोरीचे प्रमाण अत्यअल्प आहे.नगरपालिकेचे सत्ता केंद्र आपल्याकडेच राहावे यासाठी तालुक्यातील बाहुबली नेते आ. विलासराव जगताप, कॉग्रेस नेते तथा जिल्हा बँक संचालक विक्रम सांवत व माजी सभापती सुरेश शिंदे यांनी जंगजंग पछाडले आहे. एकमेकांना पाण्यात बघणारे तिन्ही यावेळी सर्व तयारीने मैदानात उतरले आहेत. जत शहरातील घरनघर प्रचार यंत्रणा राबविली जात आहे. तिन्ही पक्षातील बंडखोरीची चौथी आघाडीही उदयास येण्याची शक्यता आहे.पक्षाने उमेदवार न दिल्यास बंडोबाचे मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होणार आहेत.