जत,प्रतिनिधी : जत शहरासह तालुक्यातील शेकडो मुली माध्यमिक शिक्षणापासून, तर पदवीत्तर शिक्षणापर्यंत विविध महाविद्यालयांत शिक्षण घेत आहेत. यामुळे एसटीने नियमित शाळेत यावे लागते. परंतु काही भामट्यांकडून मुलींना प्रेमजाळ्यात अडकवून पळवून नेण्याचे तर काहीं विवाहबद्ध होण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहे. अलीकडे ही टोळी सक्रिय झाल्याची चर्चा आहे. पोलिसांनी प्रेमीयुगुलांना अडकाव करण्याचा प्रयत्न करून पालकांपुढे हजर केले असता मुलींनीच पोलिसांना सुनावल्याने पोलीस कारवाई करण्यास धजावत नसल्याची चित्र आहे.पालकांनी सावध राहण्याची वेळ आली आहे. यामुळे नागरिकांनी पोलीस तसेच निर्भया पथकाला माहिती देण्याचे आवाहन ठाणेदारसह सेवाभावी संस्थांनी केले आहे. चित्रवाहिनीवरील कार्यक्रमातून सामाजिक परिवर्तन होण्याऐवजी आता तरुणाई पाश्चात्त संस्कृतीचे अवलोकन करीत आहे. तालुक्यात 5 ते 8 हजार विद्यार्थी माध्यमिक ते महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्याने गावातून जतमध्ये ये-जा करतात. प्रत्येकांच्या गरजा वाढल्या, महागाई वाढली. यामुळे आर्थिक चणचण असल्याचा प्रश्न नेमका हेरून काही भामट्या तरुणांची टोळी सक्रिय झाली असून सकाळी 7वाजता, दुपारी 11 वाजता आणि सायंकाळी 5 वाजता बसस्थानक, बिंळूर,शेगाव,उमराणी,चौैक डफळापूर रोड किंवा जेथे बस थांबत असेल ते चौैक राखण्याचे काम करतात. एवढेच नव्हे, शिकवणी वर्गाला जाणाऱ्या मुलींनासुध्दा आपल्या रंगीबेरंगी कपडे घालून तर नानाविध प्रकारचे मोबाईल दाखवून आकर्षित करण्याचे प्रकार वाढले आहे.यामध्ये ग्रामीण मुली अलगद प्रेमजाळयात अडकून कुण्याही जातीधर्माचा विचार न करता पळून जातात. पालकांकडून पोलीस ठाण्यात तक्रारी येतात. पोलीस जिवाचे राणं करून राज्यासह परप्रांतातील कोणत्याही गावातून प्रेमीयुगुलांना पकडून आणतात. मात्र जेव्हा गुन्हा नोंदविण्याची वेळ येते तेव्हा ती म्हणते, मीच गेली होती. पालक म्हणतात, कारवाई, नको मुलगीच पाहिजे होती. अशा प्रसंगांना पोलिसांना सामोरे जावे लागते तर कुणी पालक म्हणतात गुन्हा दाखल करु नका मुलगी कमीजास्त करेल, यामुळे विनाकारण या प्रेमीयुगुलांकरिता ससेमिरा मागे लावून आपली नोकरी कोण धोक्यात टाकणार म्हणून पोलीससुध्दा अशा कार्यवाहीकरिता हतबल झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे मुली, महिला तोंडाला रुमाल बांधून तोंड झाकले असल्याने ही मुलगी कुणाची, हे ओळखणेसुध्दा कठीण झाले आहे. त्यामुळे कुणासोबत कोण, हे स्पष्ट होत नसल्याने कानाडोळा करण्याचा प्रकार होत आहे. कुणीही कुणाचीही माहिती देण्यास पुढे येत नाहीत. गत काही दिवसांपूर्वी एकाने शहानिशा करण्यासाठी रुमाल काढावयास लावला असता पोलिसांचा बोल सुनावन घ्यावे लागतात. त्यामुळे पोलिसही अशा प्रकरणी अटकाव करण्यासाठी हतबल ठरत आहेत. यामुळे शासनाने महिला, पुरुष, तरुणी, तरुणांनी तोंडाला रुमाला बांधून चेहरा झाकणाऱ्यावर कठोरे कार्यवाही करणारा कायदयाची अंमलबजावणी करण्यात यावी, अन्यथा गुन्हेगारीला पुन्हा या तोंड बांधण्याच्या प्रकारामुळे संधी मिळण्याची शक्यता आहे. पोलिसांनीदेखील साध्या वेशातील पोलीस पथक तैैनात केले असून प्रेमीयुगुलांच्या मागावर असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
चौकट:
सध्या बसस्थानक व काही चौक परिसरात जत पोलिसाचे निर्भया पथक साध्या वेशात कार्यरत आहे.अश्लील चाळे करणारे तसेच मोबाईलवर अश्लील चित्रफिती पाठविण्याचे प्रमाण वाढले आहे. असे प्रकार महाविद्यालयीन मुला-मुलींच्या मोबाईलमध्ये अधिक प्रमाणात होत असल्याने यावर पालकांनी लक्ष ठेवावे. क्लासमध्ये मोबाईल बंदी करावी. बसस्थानक परिसरात असे प्रेमीयुगुल किंवा चिडीमारी करणारे भामटे आढळल्यास कठोर कार्यवाही करण्याचा इशारा ठाणेदार राजू तासिलदार यांनी दिला आहे. नागरीकांनी आणि पालकांनी पोलिसांना सहकार्य करून पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.





