आंतरराज्यीय महामार्ग बनला मुत्यूचा सापळा
खड्डे नव्हे, डांबरीकरणच सापडेना : खड्ड्याने मरणकळा सोसण्याची वेळ
उमदी,वार्ताहर : जत तालुक्यातील पुर्व भागातील गावांना व दोन राज्यांना जोडणाऱ्या उमदी- विजयपुर महामार्गाची दयनीय आवस्था झाली आहे.
जत पुर्व भागांना कर्नाटकाशी जोडणारा व पंढरपूर पासून पुढे विजापूर पर्यत जोडणारा हा मार्ग आहे. दररोज हाजारो मालवाहतूक, प्रवाशी वाहने या मार्गावर ये-जा करतात. उमदी पासून कोतेंबोबलाद पर्यतच्या सिमावर्ती गावांना या मार्गाने जोडले आहे. त्यामुळे या गावाचे दळणवळणचा मार्ग हाच आहे. त्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहतूकीच्या हिशाबाने विचार केला तर हा महामार्ग होऊ शकत नाही. त्यातच मान्सून रिटर्नने या रस्ता कामाचे सत्य उघड केले आहे. आरटीओ व पोलिसाच्या सहयोगाने ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्याचा नकाशा बदलला आहे. खड्डे आता नाले बनले आहेत. डांबरीकरणाचे आस्तित्व मार्गावर उरलेले नाही. अनेक नाल्याचे मार्ग रोकल्याने रस्त्यावरून पाणी वाहिल्याने रस्त्याची दुर्दर्शा झाली आहे. दुरूस्थी साठी निधी खर्च झाल्याचेही वृत्त आहे. मात्र प्रत्यक्षात चालत जाणाऱ्याला सुद्धा कष्ठ पडतील असा हा आंतरराज्यीय महामार्ग बनला आहे.
वाळूच्या ओव्हरलोड वाहतुकीने मार्ग दबला
जत पुर्व भागातील बोर नदी पात्रातील बेसुमार वाळू वाहतूकीने रस्ताच दबला आहे. सर्व विभागाच्या मैत्रीपुर्ण सहयोगाने सामान्य दुचाकी व प्रवाशी वाहनांना या मार्गावरून मरणयातना सहन करत प्रवास करावा लागत आहे. शिवाय खड्डेमय रस्त्यामुळे प्रवाशी,चालकासह वाहनाचेही आरोग्य बिघडले आहे.
देशाचे वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनीच या मार्गाच्या कामात लक्ष घालून मजबूत आंतरराज्यीय महामार्ग निर्माण करावा अशी मागणी होत आहे.
जत पुर्व भागातील आंतरराज्यीय महामार्ग उमदी-विजयपूर मार्गाची झालेली आवस्था





