कोकणगाव आजही दहशतीखाली.
मंगळवारीही पोलिस छावणीचे स्वरूप : जत पुर्व भागातील चडचण टोळीचा विस्तार मोडून काढण़्याचे आता आवाहन
जत,प्रतिनिधी : श्रीशैल चडचण टोळीचा म्होरक्या शार्पशुटर धर्मराजच्या इनकॉऊटर मुळे सिमावर्ती कोकणगावात मंगळवार दुसऱ्या दिवशीही पोलिसाचा खड्डा पाहरा आहे. परिसरात अनेक ठिकाणी चडचण पोलिसांनी छापे टाकले आहेत.सोमवारी सापडलेल्या शस्ञसाठा तपासणासाठी पाठविला आहे.
कोकणगावसह जत तालुक्यातील पुर्व भागातील अनेक गावात चडचण टोळीचे प्रस्त वाढले होते. वाळू तस्करी,शस्ञतस्करी मोठ्या प्रमाणात सुरू होती. जत पुर्व भागातील अनेक जण टोळीशी जोडल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. वाळू तस्करीतील अनेक जणाच्या गेल्या काही दिवसात धर्मराज बरोबर बैठका होत असल्याची समोर येत आहे. जत व चडचण च्या मधील पट्ट्यात चडचण टोळीने पाय पसरले आहेत. धर्मराजच्या इनकॉऊटर मुळे टोळीच्या कारवाया थांबण्याची शक्यता आहे.
दरम्यान सोमवारी झालेल्या धर्मराज चडचण इनकॉऊटरने कर्नाटकसह जत पुर्व भागातील उलटसुलट चर्चा सुरू आहेत. सोमवारच्या घटनेनंतर कोकणगावात मंगळवारीही गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. मंगळवारीही घटनास्थळ पासून दोन किलोमीटर परिसरात अटकाव केला होता. पोलिसाकडून मंगळवारी परिसरात दिवसभर छापासत्र सुरू आहे. अजूनही काही प्रमाणात शस्तसाठा असण्याची शक्यता गृहीत धरून चडचण पोलिसांकडून तपासकाम सुरू आहे.दरम्यान धर्मराज चडचण इनकॉऊटरने विजापूर सह भागात उत्सव साजरा केल्याचे वृत्त आहे. चडचण टोळीमुळे कर्नाटकातील विजापूर,चडचण परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती. ती धर्मराजच्या मुत्यूमुळे काही प्रमाणात कमी होईल. शिवा़य चडचण टोळीचा शेवटचा म्होरक्या इनकॉऊटर झाल्याने टोळीला पायबंध बसणार आहे. सोमवारी जखमी झालेले उपनिरक्षक गोपाल हल्लूर व धर्मराजचा साथीदारावर विजापूर येथे उपचार सुरू आहेत.





