माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ.मोहनराव कदम, विश्वजित कदम आज जतेत
कॉग्रेसच्या पहिल्या लोकनियुक्त संरपच, सदस्याचा सत्कार समारंभ
जत,प्रतिनिधी :जत तालुक्यातील कॉग्रेसच्या पहिल्या लोकनियुक्त संरपच व ग्रामपंचायत सदस्यांचा भव्य सत्कार समारंभ आज बुधवार ता 1 ला दुपारी 12 वाजता आयोजित केला आहे.कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण जिल्हाध्यक्ष आ.मोहनशेठ कदम युवक प्रदेशाध्यक्ष विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम,जिल्हा बँक संचालक विक्रमसिंह सांवत, माजी आमदार उमाजीराव सनमडीकर,माजी सभापती पी.एम. पाटील,आकाराम मासाळ,बाबासाहेब कोडक,सौ. मनिषा जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
जत तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये कॉग्रेस पक्षाला घवघवीत यश प्राप्त झाले आहे.या निवडणूकीत कॉग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित संरपच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन केले आहे.स्थळ :बाजार पेठेतील मारूती मंदिरासमोर जत वेळ:बुधवार ता.1/11/2017,दुपारी 12.00 वाजता होणार आहे.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आप्पाराया बिरादार,कुंडलिक दुधाळ,महादेव अंकलगी,सुयज (नाना) शिंदे यांनी केले.





