जतेत चोरीच्या चार वेगवेगळ्या घटना

0
4

जतेत चोरीच्या चार वेगवेगळ्या घटना

जत,प्रतिनिधी : शहरासह तालुक्यात चार वेगवेगळ्या चोरीच्या घटनेत साठ हाजाराचा मुद्देमाल चोरट्यानी लंपास केला. दुचाकी, किंमती मोबाईलचा त्यात समावेश आहे. जत शहरात भुरट्या चोऱ्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. शहरात दिवसाढवळ्या मद्यपीच्या खिशातील पैसे काढून घेण्याचे प्रकार सुरू असताना,दुचाकी,मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. मंगळवारी अशा चार घटना समोर आल्या. जत शहरात नजिक मल्याळ गावाच्या हद्दीतील गमेशा कंपनीच्या लोकेशन 45 मध्ये चोरीचा प्रयत्न झाला.गस्ती गाडी येताच चोरी अपयशी ठरत असल्याचे दिसताच चोरट्यांनी पँनेल बोर्ड पेटवून दिला. त्यात चाळीस हाजार रूपयाचे नुकसान झाले. दरम्यान गस्ती गाडी येणाऱ्या मार्गावर जिलेटिन काड्यां पुरून गाडी उडवून देण्याचा प्रयत्न चालकाच्या प्रंसगांवधाने फसला,कांड्या दिसल्याने अनर्थ टळला. याबाबतची फिर्याद बाळासाहेब माने यांनी जत पोलिसात दिली.

जत शहरातील शिवानुभव मंडप राहणाऱ्या धऩराज बळीराम गवळी यांच्या घरासंमोर लावलेली बजाज कंपनीची 25000 किमंतीची दुचाकी (एमएच-10,बिवाए-2010) चोरट्यांनी पळविली. घटना 25 तारखेला रात्री घडली आहे. धनराज गवळी यांनी फिर्याद दिली. तिसऱ्या घटनेत हेमसिंग गिरासिंग चव्हाण (रा. राजस्थान,सध्या-वळसंग रोड जत) यांच्या दुकानातील 4100 रुपयाच्या जिलेटिन काड्यां व डिटानिटर चोरीस गेल्याची फिर्याद गिरासिंग यांनी जत पोलिसात दिली.चौथ्या घटनेत सोलापुरचे भाजपचे पदाधिकारी विजयकुमार बिराजदार जत शहरातील नातेवाईकांकडे आले होते. दुपारी बाजार करत असताना त्यांच्या खिशातील 15000 रुपये किंमचीचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. याबाबतची फिर्याद बिराजदर यांनी जत पोलिसात दिली. चारही घटनेचे गुन्हे जत पोलिसात दाखल आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here