विकास कामावरून संखमध्ये वॉट्सअप वॉर

0
7

विकास कामावरून संखमध्ये वॉट्सअप वॉर 

Image result for whatsapp

जत,प्रतिनिधी ; जत तालुक्यातील संख ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत सत्ताधारी गटाची गेल्या पंचवीस वर्षापासून असलेली सत्ता सोडावी लागली. ग्रामपंचायतीच्या योजनेत अनागोंदी,व दर्जाहीन कामे झाल्याचे आरोप आहेत.पंरतू ग्रामपंचायती शिवाय सध्या संखमध्ये चालू असलेल्या आमदार फंडातील कामाच्या दर्जाबाबत दोन्ही गटाच्या युवक कार्यकर्त्याकडून सोशल मिडियावरून जुंगलबंदी सुरू आहे.संख मधील जिल्हा परिषद मराठी शाळेजवळील बस स्टॉप नजिक मोकळ्या जागेवर पेग्विन ब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे. त्यावरून विरोधी गटाच्या एका कार्यकर्त्याने या कामात शासनाच्या नियमाप्रमाणे काम करणे गरजेचे असताना नियम डावलून सिंमेट कमी वापरत काम सुरू आहे. शिवाय ग्रामपचांयतीचा एक सदस्य असताना असे काम सुरू असल्याची वॉट्सपवरच कमेंट टाकली.संबधित कार्यकर्त्याचे आतापर्यतच्या अनुभवावरून म्हणणे रास्त होते. मात्र हे काम ग्रामपंचायीचे नसून ते आमदार फंडातील असल्याची दुसरी कमेंट सत्ताधारी गटाच्या एका जबाबदार युवक नेत्यांनी टाकत हे काम आमदार फंडातून सुरू अाहे. प्रत्यक्षात त्यांचेच समर्थक काम करत असल्याचे त्यांनाच याबाबत बोलावे यात ग्रामपचांयतीचा संबध नसल्याचा उल्लेख करण्यात आला. यावरून जोरदार जुंगलबंदी झाली. प्रत्येकानी आपआपली मते मांडली.यात कामे करताना दर्जा टिकविणे किंबहुंना त्यावर लक्ष देणे यांची जबाबदारी सामान्य जनतेसह लोकप्रितिनिधीची सुद्धा आहे. प्रत्यक्षात फंड कोणताही असो देणाऱ्या यंत्रणेकडून दर्जेदार काम करायच्या सुचना दिलेल्या असतात. त्यात संबधित ठेकेदार,लोकप्रितिनिधी,सामान्य जनतेची भुमिका महत्वाची आहे. काम चांगले व्हावे यासाठी सर्वांनी सतर्कता दाखविणे गरजेचे आहे. ते एका कार्यकर्त्याने दाखविली. त्यावर काहीना कळा आल्या असतील मात्र त्याला पर्याय नाही. यापुढेही अशी भूमिका दाखवत दर्जेदार कामे करून घेण्यासाठी प्रयत्न व्हावेत,संखच्या नवनिर्माणमध्ये संकेत टाइम्सही यापुढे सर्वांच्या बरोबरीने महत्वपुर्ण भूमिका बजावेल.

यापुढेही पाठीमागे काय झालं ह्यापेक्षा पुढं कस बदलता येईल यावरही विचारमंथन व्हाव. कारण जनतेला सर्व कळतं. म्हणून सर्वांना माफक यश दिले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here