श्रीशैल चडचण टोळीचा म्होरक्या शार्पशुटर धर्मराजचे एन्कॉऊंटर

0
13

श्रीशैल चडचण टोळीचा म्होरक्या शार्पशुटर धर्मराजचे एन्कॉऊंटर

उमदीजवळ कोकणगावात पोलिस व चडचण टोळीत चकमक :  पोलिस उपनिरिक्षक गोपाल हल्लूरसह दोघे जखमी

उमदी, वार्ताहर :महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील अनेक जिल्ह्यात दहशत असलेल्या श्रीशैल चडचण टोळीसोबत कर्नाटक पोलिसांची सोमवारी पहाटे जत तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कोकणगावमध्ये जोरदार चकमक झाली.  त्यात टोळीचा म्होरक्या धर्मराज मल्लीकार्जून चडचण,(वय-40) हा ठार झाला. चडचणचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल हल्लूर हे गंभीर जखमी झाले.  चरमकाल टोळीतीस एक गुंडही जखमी झाला आहे. व्हळी उमराणी येथील कुप्रसिध्द श्रीशैल चडचण टोळीची सुत्रे सध्या धर्मराज मल्लीकार्जून चडचण याच्याकडे होती.  

धर्मराज याचे मागील सहा महिन्यांपासून जत तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कोकणगावमध्ये वास्तव्य होते. कुख्यात गुंड धर्मराज वर चडचण पोलिस ठाण्यात बेकायदा शस्ञे बाळगल्याबद्दल अनेक गुन्हे दाखल आहेत.

नुकत्याच झालेल्या कर्नाटकातील पत्रकार गौरी लंकेश खूनसाठी धर्मराजने पिस्तूल पुरविल्याचे आरोप होते. यापुर्वीही धर्मराज एका खून प्रकरणात आरोपी होता. गेल्या सहा महिन्यापासून तो जामिनवर बाहेर आहे. खूनापासून धर्मराज चर्चेत आला होता. त्याच्या महाराष्ट्र-कर्नाटक सिमावर्ती गावात दहशत वाढली होती. कर्नाटकात येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूकीत त्यांने अनेकाचे मुडदे पाडण्याची धमकी दिल्याची चर्चा होती. त्यामुळे पोलिस सतर्क झाले होते.यापुर्वीचे कुख्यात गुंड पुत्राप सावकर व फयाज मुश्राप या दोन गुंडाची टोळी होती त्यांच्यात वर्चस्व वादातून पुत्राप सावकर यांचा खून झाला होता. त्यात धर्मराज हा आरोपी होता,त्यामध्ये त्याला अटक झाली होती.मात्र काही दिवसांपूर्वी धर्मराज जामिनावर बाहेर आला होता. तो बाहेर आल्यावर अवैध शस्त्र बाळगत असल्याच्या कारणा वरून त्याची झडती घेण्यासाठी  सपोनि गोपाल हल्लूर व काही पोलिस त्याच्या मागावर होते. सोमवारी पहाटे कोकणगांव (ता इंडी) येथील घरी मल्लिकार्जून असल्याचे कळताच पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकत अवैध शस्त्रे जप्त करण्यास सांगितले. मात्र तो घरात जावून रिव्हॉल्वर घेऊन पोलिसावर गोळीबार करु लागला त्यातील काही गोळ्या सपोनि हल्लूर व पोलिसांला लागल्या, त्यात पोलीस जखमी झाले. मात्र हल्लूर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून स्वंरक्षणासाठी गुंड धर्मराज यांच्यावर गोळीबार केला, त्यात गुंड धर्मराज जागीच ठार झाले.व त्यांचा अन्य एक साथीदार व पोलिस अधिकारी व काही कर्मचारी जखमी झाले आहेत.कोकणगाव येथील धर्मराज याच्या फार्महाउसवर चडचण पोलिसांनी सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास छापा टाकला. यावेळी पोलिस व चडचण टोळीत जोरदार चकमक झाली. पोलीसांनी केलेल्या गोळीबारात धर्मराज याच्या छाती व पोटात गोळ्या लागल्या.  पोलीस उपनिरीक्षक गोपाल हल्लूर यांच्या मांडीत गोळी लागली.  धर्मराज याचा साथीदार शिवानंद बिराजदार हाही गोळी लागून जखमी झाला आहे. सर्व जखमींना उपचारासाठी विजापूर येथील बीएलडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  धर्मराज याचा उपचार सुरू असताना सकाळी साडेअकरा वाजता मृत्यु झाला. श्रीशैल चडचण टोळीचा प्रमुख श्रीशैल याचा 1997 साली सांगली पोलिसांनी खातमा केला होता.  खून, खंडणी, दरोडा,  तस्करी अशा अनेक गुन्ह्यात तो महाराष्ट्र व कर्नाटक पोलीसांना हवा होता.दरम्यान माहिती मिळताच घटनास्थळापासून पोलिसांनी दोन किमी आंतरासाठी नो एंट्री केली होती.याची दिवसभर उमदी सह संपुर्ण जत तालुक्यात चर्चा सुरू होती.दरम्यान गुंड धर्मराज यांचा विरोधी टोळीकरून इनकॉऊटर करवून आणल्याचा आरोप त्यांच्या आईने केला आहे.

1990 च्या दशकातील श्रीशैल टोळीची अखेर

मुळचे इंडी तालुक्यातील व्हळी उमराणीचा श्रीशैल चडचण यांच्या वडीलाचा त्या गावातील सावकार पुत्राप्पा भैंरगोड यांने खून केला. त्याचा बदला घ्यायचा म्हणून श्रीशैलने गुन्हेगारीचा मार्ग स्विकारला होता.सिमाभातील तत्कालीन डॉन चंदाप्पा हरिजन यांच्या टोळीपासून श्रीशैल प्रवास स्वत:ची टोळी करण्यापर्यत आला होता. बदल्याची आग श्रीशैला गप्प बसू देत नव्हती त्यातून व्हळी उमराणीतील सावकार भैंरगोड यांच्या वाड्यावर हल्ला केला.त्यात आठजण ठार झाले. मात्र पुत्राप्पा भैंरगोड बचावला. त्यांनतर श्रीशैल टोळीच्या कारवाया वाढल्या होत्या. त्यातून जत तालुक्यातील जाड्डरबोबलाद येथील एका व्यापाऱ्यांची ट्रक चोरीचा त्याच्यावर आरोप होता. शिवाय खंडणी,खून,दरोडे,अपहरण,शस्ञतस्करी अनेक गुन्हे श्रीशैल दाखल होते.महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांनी खिंडीत पकडून श्रीशैल चडचणचा 1997  ला बारामती चवळ पाठलाग करून एन्काऊंटर केला होता.पुढे चडचण टोळीची शुत्रे त्याचा साथीदार अंबाजी यांने ताब्यात घेतली होती.अंबाजी व त्याच्या साथीदाराचा कर्नाटक पोलिसांनी एन्काऊंटर केला. श्रीशैल मुत्यूनंतरही पुत्राप्पा भैंरगोड यांचा सूड घेण्याची धग श्रीशैलच्या पुतण्यापर्यत कायम होती. त्यांतून पुतण्या शांताप्पाचा भैंरगोड टोळीने खातमा केला. पुढे धर्मराजने टोळीची सुत्रे हाती घेतली होती. चडचण टोळीची पुणे व कर्नाटकातील सिमावर्ती कोकणगावसह अनेक गावात मालमत्ता आहे. मल्लिकार्जून चडचण सध्या पुणे येथे वास्तव्यास असल्याचे वृत्त आहे. एंकदरीत बदल्याच्या आगीने तीन पिठ्याचा एंड धर्मराजच्या खूनामुळे झाली आहे.

मोठा शस्ञसाठा जप्त 

दरम्यान धर्मराजच्या एन्काऊंटर नंतर त्यांच्या फर्महाऊसची तपासणी करत दोन लांब बंदुका,पाच पिस्तूल सह अन्य शस्ञ साठा जप्त केला आहे.

कोकणगाव पोलिस छावणी

चकमक झालेल्या धर्मराजच्या फर्महाऊसपासून दोन किलोमीटरच्या आसपास कोणासही प्रवेश करण्यास मनाई करण्यात आले आहे. हाजारो लोंकांनी गर्दी केली आहे.

मयत गुंड मलिकार्जून चडचण जखमी पोलिस उपनिरक्षक गोपाल हल्लूर,चकमक झालेले धर्मराजचे फर्महाऊस

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here