सहशिक्षक दिलीप वाघमारे यांचा “लायन्स आदर्श शिक्षक” पुरस्काराने सन्मानित
संख,वार्ताहर :जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बाबरवस्ती(पांडोझरी ) येथे 7 वर्षापासून कार्यरत असलेले सह शिक्षक दिलीप वाघमारे यांना लायन्स व लायनेस क्लब जतच्या वतीने लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवराचा लायन्स व लायनेस क्लब जत च्या वतीने प्रती वर्षी सत्कार करण्यात येतो. त्याच अनुषंगाने यंदाचा लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा नुकताच सपन्न झाला.
या मध्ये सध्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बाबरवस्ती पांडोझरी 7 वर्ष पासून कार्यरत असलेले सहशिक्षक दिलीप वाघमारे यांची लायन्स आदर्श पुरस्कारासाठी निवड करण्यात आली, शैक्षणिक व सामाजिक कार्य करणारे मारोती वाघमारे हे तालुक्यातील शिक्षकांना आदर्श ठरतील असे व्यक्तिमहत्व आहेत. नुसते शिकविणे इथपर्यत मर्यादीत न राहता वाघमारे यांनी बाबरवस्ती शाळा आदर्श शैक्षणिक मंदिर बनविले आहे. अगदी दुष्काळात लोकवर्गणीतून शाळेभोवती वृक्षवल्ली जगवत पर्यावरण जपले आहे. त्याच बरोबर त्याचा साहीत्य लेखनात हातखंडा आहे.त्याचे अनेक विशेषांक व मासिक अंकात कविता प्रकाशित करण्यात आल्या आहेत. तर महाराष्ट्र राज्य मागासर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्हा संघटक म्हणून कार्य करतात, तर गायनाणाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे मौलिक सामाजिक कार्य करतात.
कायम दुष्काळी तालूक्यात टँकरने वाडी वस्तीवर पाणी पुरवठा असतो, त्या परिस्थितीत शाळेत हिरवाई कायम ठेवण्यासाठी उन्हाळी सुट्टीत सलग दोन वृक्ष संगोपन हा उपक्रम सर्व विद्यार्थी,पालक व नागरिकांना बरोबर घेत उपक्रम यशस्वी केला आहे. व करत आहेत.
ज्ञान ज्योती सावित्रीबाईफुले विशेषांक 2017 संपादन केले.शाळेत बोलक्या भिंतीची शाळा म्हणून नावा रुपाला आणली आहे व ज्ञानरचनावाद व असे विविध उपक्रम राबवितात.शाळेत राबविलेल्या विविध उपक्रमामुळे उपक्रमशील शिक्षक म्हणून सतत त्यांचे कौतुक होत असते.त्याच्या या सामाजिक शैक्षणिक कार्याची दखल घेऊन विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्या बदल रविवार दि.29 रोजी उमा नर्सिग कॉलेज विजापूर रोड येथे आ.अनिल बाबर विटा,आ.विलासराव जगताप जत,वासुदेव कलगटगी,प्रा.एन.ए. इनामदार,ला.डॉ .रविंद्र आरळी, मा.ला.राजेंद्र आरळी आदी मान्यवरांच्या उपस्थित हा पुरस्कार देण्यात आला.त्याच्या या यशस्वी गौरव कार्याबदल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.