जाल्याळ येथे ट्रँक्टरच्या चाकाखाली गेल्याने चालकाचा मुत्यू
संख,वार्ताहर : जाल्याळ (ता.जत) येथे टँक्टरच़्या अपघातात चालकाचा मुत्यू झाला. तर ट्रॉलीतील दोघे जण जखमी झाले आहेत. घटना शनिवारी रात्री बाराच्या दरम्यान घडली. चालक संग्राम शिवाजी खोत(वय- 22,रा. कोकरूड, जि. कोल्हापूर)असे मयत चालकाचे नाव आहे. दरम्यान शनिवारी संख आरोग्य केंद्रात मयत चालकाचा मृतदेह खाजगी वाहनातून पहाटे एक वाजता आणले होते. मात्र वैद्यकीय अधिकारी नसल्याने रविवारी दुपारी तीन पर्यत मृत्तदेह आरोग्य केंद्रातच डॉक्टरची वाट बघत ठेवण्यात आला होता. तो मयत झाला आहे, हेही घोषित करण्यासाठी केंद्रात जबाबदार कर्मचारी नसल्याने तब्बल 15 तास मृत्तदेह बेवारस पणे केंद्रात ठेवल्याने मरणानंतरही यातना दिलेल्या संबधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली.
जाल्याळ येथून ऊसतोडी साठी मजूर घेऊन चालेला टँक्टर (एमएच-09,एएल 9046)हा रात्री बाराच्या दरम्यान जात असताना टँक्टरचा स्टेरिंअग तुटल्याने चालकाचा तोल गेल्याने चालक टायर खाली सापडल्याने जागीच मुत्यू झाला. तर ट्रॉलीतील दोघे जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्याच्यावर विजापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र मृतदेहाची संख अरोग्य केंद्रात अहवेलना झाल्याने नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दुपारी दोनच्या दरम्यान उमदी पोलिस आल्यानंतर मृतदेह जत येथील रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला.
याबाबत गुन्हा उमदी पोलिसात दाखल झाला आहे.