खैरावमध्ये रासपला यश
जत तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीत रासपला भरीव यश
येळवी,वार्ताहर : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायती निवडणूकीत राष्ट्रीय समाज पक्षाने खैरावमध्ये एकहाती सत्ता खेचून आणली. आणि तालुक्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावत सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत आपले वेगळे स्थान निर्माण करत भाजप व काँग्रेसला सक्षम तिसरा पर्याय असल्याचे सिद्ध केले. खैरावमध्ये रासपने एकहाती सत्ता काबीज करत विरोधकांना सडेतोड उत्तर दिले. खैराव येथे रासपचे शाखा अध्यक्ष हरीबा दुधाळ व उपाध्यक्ष नजरुद्दीन मुलाणी यांच्या नेतृत्वाखाली सरपंचपदा सहीत नऊ पैकी आठ सदस्य विजयी झाले. खैरावमध्ये सरपंचपदी राजाराम आबाजी घुटुकडे तर सदस्यपदी रामचंद्र विठ्ठल पाटील, ईराप्पा लिंबाजी करांडे, नागेश धुळा करांडे, कोंडीबा कृष्णा घुटुकडे, राजाक्का कुमार साळे, शिलाबाई बिडू घेरडे, रुक्मिणी महादेव पुजारी, शोभा कुमार क्षीरसागर विजयी झाले.





