गोंधळेवाडी तील बाबा सिमेंट
वीट कारखान्यातील कामगारांना मारहाण
जत,प्रतिनिधी : गोंधळेवाडी ता. जत येथील बाबा सिमेंट विट कारखान्यातील कामगारांना काही स्थानिक लोकांनी मारहाण करून दमदाटी केल्याची तक्रार उमदी पोलिसात दाखल झाली आहे.
गोंधळेवाडी येथे बाबा एंटरप्रायजेस हा इंटरलॉकिन विट तयार करण्याचा कारखाना आहे.तेथे अनेक कामगार करत आहेत. काही दिवसापुर्वी येथे काम करणाऱ्या एका कामगारांना काही स्थानिक अज्ञात इसमानी मारहाण करून दमदाटी केली आहे. त्याबाबत कामगारात भितीचे वातावरण असून पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी व्यवस्थापनाकडून करण्यात आली.





