ग्रामपंचायत निवडणूकीतील भाजपच्या विजयी शिलेदाराचा भव्य सत्कार सोहळा
जाड्डरबोबलाद मध्ये आयोजन
माडग्याळ,वार्ताहर: जत तालुक्यात नुकत्याच संपन्न झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या निर्भेळ यश व अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे कॉंग्रेसचे गट खालसा करत मक्तेदारी मोडीत काढत भाजपच्या शिलेदारांनी सत्ता काबीज केेली आहे.याचे औचित्य साधत भाजपच्या विजयी लोकनियुक्त संरपच,सदस्याचा सत्कार सभारंभ जाडरबोबलाद येथे रविवारी दि.29 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केला आहे. या सोहळ्यास खा. संजय पाटील व भाजपचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख,आमदार विलासराव जगताप,जि. प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख व उपाध्यक्ष सुहास बाबर,भाजप नेते डॉ. रवींद्र आरळी आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती भाजप नेते शिक्षण व आरोग्य सभापती तम्मानगौडा रविपाटील यांनी दिली. भाजपने केंद्रात व राज्यात सत्ता आल्यापासून विकासकामावर भर दिला आहे.अनेक महत्त्वाच्या योजना राबवूनही सामान्य नागरिकांना लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे. देशात कानोकोपऱ्यातील जनतेपर्यंत शासनाच्या योजना कशा पोहचतील याच्यावर लक्ष केंद्रित केले आहे. जत तालुक्यात ही भाजपचे आमदार विलासराव जगताप यांनी केलेल्या विकास कामामुळे जत तालुक्यातील सुमारे 36 ग्रामपचांयतीत भाजपचे संरपच झाले आहेत. कॉग्रेसचे अभेध गट खालसा करत मतदारांनी भाजपला पसंती देत ग्रामपंचायतची कारभार हातात दिला आहे.तालुक्यातील महत्वाच्या आसणाऱ्यां संख,सोन्याळ,जाड्डरबोबलाद, बाज,डफळापूर,कुंभारी आदी गावात कमळ फुलले आहे. तालुक्यात भाजपचा झेंडा फडविणाऱ्या या सर्व शिलेदाराचा सत्कार
सभारंभाचे आयोजन भाजप नेते तथा सभापती तम्माणगौंडा रवीपाटील यांच्या पुढाकाराने जाड्डरबोबलाद येथे केले आहे. तालुक्यातील लोकनियुक्त संरपच व सदस्याचे सत्कार यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार आहेत. या कार्यक्रमासाठी शिवाजीराव ताड, आप्पासो नामद, जि. प. सदस्य सरदार पाटील, रेखा बागेळी, मंगल नामद, स्नेहलता जाधव,सुनिता पवार, उपसभापती शिवाजी शिंदे, सदस्य मनोज जगताप, विष्णु चव्हाण, रामण्णा जिवण्णवर,लक्ष्मी माळी, श्रीदेवी जावीर,तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडोडगी आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रवीपाटील यांनी केले.






