शेवटच्या मंत्रीमंडळ विस्तारात जतला कोणते स्थान
डॉ.रविंद्र आरळींचे नाव महामंडळासाठी चर्चेत ; बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील आश्वासन पुर्ती करणार का?
जत,प्रतिनिधी : राज्य शासनाचा शेवटचा मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची धांदल संपली. आता वेध लागले आहेत ते, राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे! यात जतला कोणते स्थान मिळणार, हा नेहमीचा प्रश्न आहेच! कारण गेल्या तीन वर्षांपासून मंत्रिमंडळात सांग स्थान मिळणार का आणि कोणाला मिळणार, नुसती चर्चाच झाली, पण जतसह जिल्ह्याच्या वाट्याला मात्र काहीच आले नाही. अगदी महामंडळाचे अध्यक्षपदही नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाही सांगितल्याप्रमाणे हा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.त्यामुळे पुन्हा जतचा विचार होण्याची शक्यता आहे. जतचे आमदार विलासराव जगताप यांच्या कार्यकर्त्यांनादेखील जगतापच मंत्री होणार, असे वाटत आहे. जतचे भाजपचे जेष्ठ नेते व वैद्यकीय क्षेत्रातील मातब्बर असणारे डॉ. रविंद्र आरळी
यांनीही सन्मानाचे पद मिळण्याची शक्यता आहे. सांगलीचे पालकमंत्री असताना भाजपचे राज्यातील दोन नंबरचे नेते बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी जत येथील भाजप नेते डॉ. रविंद्र आरळी यांच्या हॉस्पिटलच्या कार्यक्रमात डॉ. आरळीना सन्मानाचे पद देण्याचे आश्वासन दिले होते. राज्यातील शेवटच्या टर्ममध्ये मंत्री पाटील आश्वासन पुर्ती
करणार का? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.त्यामुळे नव्या विस्तारात जतला कोणते स्थान मिळणार यांची उत्सुकंता लागली आहे.





