शेतकरी कर्जमाफी …कृषी मंत्री आहेत कुठे ? – नवाब मलिक

0
8

शेतकरी कर्जमाफी …कृषी मंत्री आहेत कुठे ? –  नवाब मलिक




मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) –  कर्जमाफी सरकार प्रमाणेच किती बोगस आहे हे सिद्ध झाले आहे. सरकारच्या ऑनलाईन कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे डिजीटल सरकारचा हा बोगस कारभार असल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

मलिक म्हणाले की, ही शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे. असे असतानाही कृषी मंत्री कुठे आहेत असा प्रश्नही मलिक यांनी उपस्थित करत मुख्यमंत्री हे कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांच्यावर अविश्वास का दाखवत आहेत याची विचारणा केली. त्यांच्या एेवजी सहकार मंत्री सुभाष देशमुखच पुढे पुढे करताना दिसत आहेत. ज्या मंत्र्यांनी नोटबंदीच्या काळात कोट्यवधींची हेराफेरी केली त्यांच्यावरच ही कर्जमाफीची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी का दिली असा प्रश्नही त्यांनी विचारला. फुंडकर यांना कृषी किंवा सहकारमधील काही समजत नाही का ? म्हणून मुख्यमंत्री देशमुखांना झुकते माप देत आहे अशी विचारणा त्यांनी केली. असे असेल तर सुभाष देशमुखांनाच कृषी मंत्री करा असा सल्ला त्यांनी दिला. शिवाय सुभाष देशमुख यांच्या संस्था जशा बोगस आहेत तसे ते मंत्री म्हणून बोगस असल्याची टिकाही त्यांनी केली. बोगस आधार कार्डवर कर्जमाफी कशी झाली. याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहीजे. शिवाय ज्यांना कर्जमाफी झालेली नाही अशा शेतकऱ्यांनाही कर्जमाफीची प्रमाणपत्र कशी दिली गेली  असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांची सरकारने एेन दिवाळत फसवणूक केली आहे. जर ही कर्जमाफीची प्रक्रिया 10 दिवसात पूर्ण केली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांसाठी संघर्ष करेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here