जत डाक उपविभागाने सांगलीची मान उंचावली
सर्व शासकीय योजना राबविण्यात राज्यात उल्लेखनीय: प्रवर अधिक्षक नाईक
जत,प्रतिनिधी : जत उपविभागातील कर्मचाऱ्यांनी चालू वर्षात विविध शासकीय योजना विशेष: ग्रामीण टपाल जिवन विम्याचे संपुर्ण महाराष्ट्रात उल्लेखनीय कामगिरी करून सांगली विभागाची मान उंचावली आहे.असे गौरवौद्वार सांगली विभागाचे प्रवर अधिक्षक ए. के.नाईक यांनी काढले. ते डफळापूर येथे आयोजित डाक मेळाव्यात बोलत होते.
जागतिक टपाल दिन व डाक सप्ताहाच्या निमित्ताने पोस्ट खात्याच्या जत विभागाच्या डाक सेवक व कर्मचाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला.
नाईक पुढे म्हणाले, जत विभागाकडून ग्रामीण टपाल विम़्यांतर्गत चालू आर्थिक वर्षात 591 नविन प्रस्ताव घेत 63.77 लाख नविन हप्त्याच्या रक्कमा जमा केल्या आहेत. अशी कामिगिरी करणारा जत विभाग राज्यातला पहिला विभाग आहे.सतत दुष्काळी परिस्थिती असणाऱ्या जत विभागातील हे काम कौतुकास्पद आहे. पोस्टाच्या विश्वार्हता यामुळे पुन्हा स्पष्ट होते.पोस्टाच्या इतर योजना पंतप्रधान स्वास्थ विमा योजना व सुकन्या समृध्दी योजनेतही जत विभागाचे काम उल्लेखनीय आहे.
जत विभागातील विविध कामाचा आढावा डाक निरिक्षक मयुरेश कोले यांनी यावेळी सांगितला.
डाक विमा पॉलिसी अंतर्गत निधन झालेल़्या लत्ता शेंडगे आरेवाडी यांच्या वारसांना विमा रक्कमेचा चेकचे वितरण यावेळी करण्यात आले. डाक सप्ताह निमित्त जनजागृत्ती करून सुकन्या समृध्दी योजनेत मोठा प्रमाणात काढलेल्या खात्याचे पासबुक व फ्रुटबकेटचे वाटप उपस्थित मान्यवरांनाच्या हस्ते करण्यात आले.
विभागातील एक लाखापेक्षा जादा विमा हप्ता जमा करणाऱ्या कर्मचारी व मागील अभिलेख वर्षातउत्कृष्ठ कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रवरअधिक्षक नाईक यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी डाक निरिक्षक सचिन कामटे,उपविभागातील सर्व उपडाकपाल,डाक अधिक्षक,व सर्व ग्रांमीण डाकसेवक उपस्थित होते. सुत्रसंचालन एस.डी. काळे,आभार व्ही.एस.बुरूटे यांनी मानले.





