पुन्हा एकदा लालपरी धावू लागली.

0
2

पुन्हा एकदा लालपरी धावू लागली.

Image result for parivahan

जत,प्रतिनिधी : जत सह राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सलग चार दिवस बंद असलेली एसटी बसेस(लालपरी) पुन्हा एकदा सर्वत्र धावू लागली आहे.

तालुक्यातील लाखो प्रवाशाची प्रवास वाहिनी बनलेली लालपरी बंदने जत तालुक्यातील अनेक गावातील दळणवळण बंद पडले होते. जत तालुक्यातील अनेक मार्गावर वडाप वाहतूक पोहचत नाही. तेथे बसेस जात असल्याने लालपरी बंद झाली की दुसरी वाहतूक व्यवस्था नसल्याने शहराशी संपर्क तुटतो. ऐन दिवाळीत नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. एसटी अभावी ट्रंक,वडाप, टँक्टर आदि वाहनातून धोकादायक प्रवास करावा लागला.कधी नव्हे एवढे आक्रमक होत एसटीच्या कर्मचारींनी एकजूट दाखवून पुर्ण बसेस बंद केल्या होत्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांची आक्रमकता सरकार दरबारी दखलपात्र झाल्याने पगार वाढीवर चर्चा सुरू झाली आहे. प्रांरभी आठ हाजारापर्यत पगार वाढीचा प्रस्ताव समोर येत आहेत. मात्र आक्रमक कर्मचाऱ्यांमुळे अंदोलनाची दिशा एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी येथून पुढे एकप्रकारे वरदान ठरेल. भविष्यात या एकीचा येणारे प्रत्येक सरकार गंभीर विचार करेल. अखेर सरकार व कर्मचाऱ्यांचा हा वाद न्यायालयात गेला. त्यात दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकत उच्च न्यायालयाने संप नियमबाह्य ठरवत कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले. शिवाय सरकारला कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत तातडीने निर्णय घेण्याचेही आदेश केलेत. त्यानुसार महामंडळ, परिवहन खाते व सरकार दरबारी हालचाली सुरू झाल्या आहेत. चार दिवसाच्या संपानंतर पुन्हा कर्मचारी रुजू झाल्याने तालुक्यासह राज्यातील सर्वच मार्गावर लालपरी मोठ्या दिमाखात पुन्हा धावू लागली आहेत.बस स्थानके परत गर्दीने फुलली आहेत. 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here