ट्रक उलटलून अपघातःतब्बल दहा जणांचा मृत्यू,तर 9 प्रवासी जखमी
सांगली: ऐन दिवाळी सणात सांगलीत पहाटे भीषण अपघात झाला. फरशी घेऊन जाणारा ट्रक उलटून तब्बल दहा जणांचा मृत्यू झाला. तर 9 प्रवासी जखमी आहेत. सांगली जिल्ह्यातील मणेराजुरीजवळ ही भीषण दुर्घटना घडली.एस टी बंद असल्याने हे मजूर ट्रकने प्रवास करत होते.मृतांमध्ये 3 महिला आणि 7 पुरुष मजुरांचा समावेश आहे. एसटी संपामुळे हे मजुर ट्रकमधून प्रवास करत होते.ऐन दिवाळी सणात सांगलीत नियतीचा घाला.तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे फरशीचा ट्रक उलटून झालेल्या अपघातानंतर प्रशासनाने तात्काळ पावले उचलत आवश्यक ती कार्यवाही केली आहे. सर्व परिस्थितीवर जिल्हाधिकारी वि. ना. काळम स्वतः लक्ष ठेऊन आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, विजापूरहुन फरशी भरलेला ट्रक तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे आज पहाटे उलटला. या अपघातात ट्रकमधील 32 व्यक्तींपैकी 10 व्यक्ती जागेवरच ठार झाल्या. तर 22 जखमी आहेत. पैकी 11 जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे आणि उर्वरित 11 जखमींवर ग्रामीण रुग्णालय, तासगाव येथे उपचार सुरु आहेत.
अपघातानंतर मौजे तासगाव, भोसे, हातनूर आणि पलूस येथील 108 क्रमांकांच्या 4 रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि उपचार सुरु करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली. तसेच, लोकप्रतिनिधी व विजापूरचे जिल्हाधिकारी शिवकुमार यांना घटनेची माहिती देण्यात येऊन सिंदगी व अन्य तालुक्यातील जखमींबाबत कल्पना देण्यात आली आहे.
उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, मिरज तहसीलदार शरद पाटील, कवठेमहांकाळ तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्यासह महसुल यंत्रणेला मदतकार्यासाठी तात्काळ पाठवण्यात आले आहे. तसेच, विजापूर महसुल यंत्रणेचीही एक टीम सांगलीच्या दिशेने रवाना झाली आहे. पोलीस आणि वैद्यकीय विभागास पुढील आवश्यक आणि कायदेशीर कार्यवाहीसाठी सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मृतदेह पाठवण्यासाठी 4 शववाहिकांची सोय जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.
मृत व्यक्तीपैकी सहा व्यक्तींची ओळख पटली असून त्यापैकी दोघांची नावे संगमा सिदाप्पा भिमसे (वय 60), रा. मंगळूर, ता. सिंदगी आणि श्रीमत गुलालप्पा गौड (वय 50) रा. कनमेश्वर, त जेउरगी, ( दोन्ही जि. विजापूर) अशी आहेत.
जखमींची नावे पुढीलप्रमाणे
इंदूबाई शामराव निंबाळकर (वय 30), रा. शहाबाद जि. गुलबर्गा, परशुराम यल्लप्पा पुजारी (वय 25), रा. ताळेकुटी जि विजापुर, बसम्मा यलाप्पा पुजारी (वय 45), रा. पेरापुर, जि बेळगावी, रुपेश शिवाजी राठोड (वय 27), रा. मुनकोळ जि गुलबर्गा, संतोष महादेव मंजुळे रा. शहा:बाद जि गुलबर्गा, अशोक रेवाप्पा बिरादार (वय 50), लक्ष्मीबाई लक्ष्मण मादार (वय 30), रा. शिंदगी जि विजापूर, लक्ष्मण प्रभू मादार (वय 40) रा शिंदगी, बेबी समिरहुसेन शेख (वय 45), रा. शहापूर जि गुलबर्गा, साहेबअण्णा महादप्पा ज्ञानमंत (वय 65) रा. अंकलबा, जि गुलबर्गा, नागाप्पा शामराव निंबाळकर (वय 8) रा. शहाबाद




